Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्यामधील नॉमिनेश टास्क नुकताच पार पडला. यावेळी दोन्ही गटातील सदस्यांनी आपापली रणनीती केली. तसंच दोन्ही गटातील सदस्य एकमेकांना डील देताना देखील दिसले. पण वैभव चव्हाणने दिलेली डील फसली. आता या आठवड्यात आर्या जाधव, इरिना, अभिजीत सावंत आणि वैभव चव्हाण हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धकांपैकी कोण ‘बिग बॉस’च्या घराबाहेर होतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच इरिनावरून निक्की आणि वैभवमध्ये कडाक्यांची भांडणं पाहायला मिळणार आहेत. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात काय होणार? याचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एकाबाजूला निक्की व अरबाज बसलेले दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला इरिना व वैभव बसले आहेत. याच वेळी इरिनाच्या नॉमिनेशवरून निक्की व वैभवमध्ये वाद होता दिसत आहेत.
निक्की म्हणते, “बरं झालं, इरिना नॉमिनेट झाली. आता एल्मिनेट झाली पाहिजे.” हे ऐकून वैभव रागात म्हणतो, “निक्की आता अती होतंय.” निक्की म्हणते, “ती माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. ती आपल्यात अॅड झालीये.” यामुळे वैभवचा राग अनावर होतो. तो उठतो आणि निक्की जवळ जाऊ म्हणतो, “मी असं काहीतरी फालतू ऐकून घेणार नाही.” यावर निक्की म्हणते की, मी तुला बोलली नाहीये, इरिनाला बोलली आहे. तुझी बोट कानात घाल. वैभव म्हणतो, “तुझ्यापण हाताला बोटं आहेत ना, मग ती तू तोंडात घाल.” त्यावर निक्की इरिना टोला लगावत वैभवला म्हणते, “मी तुला घरातून माझा पीए बनवून घेऊन नाही आलीये.” वैभव म्हणतो, “हो का?”
यानंतर निक्की रागाच्या भरात समोरच्या टेबलवर असलेली भांडी लाथाडताना दिसत आहे. अरबाज तिला शांत कर आहेत. पण इरिनाच्या नॉमिनेशवरून मुद्दा तापला आहे. निक्की व वैभवमधील वाद टोकाला पोहोचल्याचं दिसत आहे.
दरम्यान, याआधीही इरिना आणि निक्कीमध्ये वाजलं होतं. तेव्हा वैभव दोघींमध्ये काहीही बोला नव्हता. पण आता दोघींच्या भांडणामध्ये वैभव पडला असून पुढे काय होतं? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.