Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दिवसेंदिवस रंगत चाललं आहे. घरातील सदस्य कमी होत असल्यामुळे चुरसीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. आठव्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर झाले. वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुलेला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अरबाज पटेल घराबाहेर गेला. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अशातच निक्की विरुद्ध घर असं समीकरण पाहायला मिळत आहे. नुकतेच काही प्रोमो समोर आले आहेत. ज्यामध्ये निक्कीबद्दल घरातील सदस्य चर्चा करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. एका प्रोमोमध्ये घरच्या कामावरून निक्कीवर सदस्य वाद घालताना दिसत आहेत. तर दुसऱ्या प्रोमोमध्ये अरबाज घराबाहेर जाताना झालेल्या ड्रामाबद्दल चर्चा करत आहेत.

हेही वाचा – “Unfair झालं”, ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “मी स्वतःला विजेता…”

पहिल्या प्रोमोमध्ये पंढरीनाथ जान्हवी, वर्षा उसगांवकरांना म्हणतो की, ठरलंय ना. ती काही करणार नाही. तिचं तिच बनवणार म्हणून…त्यावर निक्की म्हणाली, “हे तुम्ही ठरवलंय, तिने नाही ठरवलंय. तिचं मत वेगळं आहे. तुमचं मत वेगळं आहे.” त्यानंतर धनंजय म्हणाला, “तिने म्हटलंय का तसं करणार आहे म्हणून.” जान्हवी म्हणते, “जाऊ देत खाऊ दे..खाण्याचं काही नाही.” त्यावर पंढरीनाथ म्हणतो, “तुम्ही बनवणार आहात, तुम्ही ठरवा.”

त्यानंतर निक्कीला टोमणा मारण्यासाठी धनंजय पंढरीनाथला म्हणतो, “पॅडी दादा, आपल्या घरात एक व्यक्ती असते ना. जी कमवत नसते. तरीही खात असते. तिला रात्री कधी धुसपूस करताना रडलेलं बघितलंय का? अभिजीत, कसे असतात ना ते, त्यांचे विचार.” यावर निक्की म्हणते, “अभिजीतने असा व्यक्ती बघितला असेल.” धनंजय म्हणतो, “तो हो म्हणाला…तू त्याचं सारखं नाव घेऊन भीती का घालतेस?” निक्की म्हणते की, “माझं तोंड, त्याचं नाव…तुम्हाला काय करायचं आहे. त्याला प्रोब्लेम आहे का? जर असेल तर तुझं नाव नाही घेणार. तुला आहे का प्रोब्लेम तुझं नाव घेते आणि तुझ्याशी बोलते त्याचा?” अभिजीत स्पष्ट म्हणतो, “नाही.”

हेही वाचा – Video: “आता रडायचं नाही”, अरबाज बाहेर पडल्यानंतर सूरजने दिला निक्कीला आधार, म्हणाला, “मी आहे ना…”

दुसऱ्या प्रोमामध्ये अरबाज घराबाहेर जाताना निक्कीने केलेल्या ड्रामाविषयी पंढरीनाथ, धनंजय, अंकिता चर्चा करत आहेत. अंकिता म्हणते, “काल जे निक्की, अरबाजचं झालं. ती वेळ आपल्या वरतीही येणार.” यावर धनंजय म्हणाला, “येणार. तू (अंकिता) ४० दिवस मोजूनच नको.” तेव्हा पंढरीनाथ निक्कीने केलेल्या ड्रामाविषयी म्हणाला, “तुम्ही एवढं कराल? लिव्हिंग एरियापासून जाईपर्यंत होईल. अख्ख?” त्यावर धनंजय आणि अंकिता म्हणाले, “तेवढं होणार नाही”

धनंजय म्हणाला की, त्या दिवशी झालं तेवढंच होईल. त्याच्यापेक्षा २५ टक्के कमी होईल. ओव्हर नाही होणार. दिवस कमी राहिले आहेत. एकमेकांना समजून खेळू. आता तुझा, माझा नंबर आलाय.

हेही वाचा – “त्याचा पतंगाची दोरी…”, अरबाज पटेलच्या एलिमिनेशनवर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाला…

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकर घेणार प्रेक्षकांचा निरोप

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ची जोरदार चर्चा सुरू असली तरी दुसऱ्याबाजूला हे पर्व ७० दिवसांत गुंडाळणार असल्याचं समोर आलं आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेक कलाकारांसह प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.