Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवस ‘बिग बॉस’चा खेळ रंगणार आहे. सोमवारी झालेल्या भागामध्ये ‘बिग बॉस’ने यासंदर्भात घोषणा केली. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आता उरलेल्या आठ सदस्यांमध्ये चुरसीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू झाल्यापासून घरात दोन गट पाहायला मिळाले. ‘ए टीम’ आणि ‘बी टीम’. ‘ए टीम’मध्ये अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी, घनःश्याम, इरिना होते. तर ‘बी टीम’मध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पंढरीनाथ, सूरज, वर्षा उसगांवकर, आर्या, योगिता, निखिल, पुरुषोत्तम होते. पण हळूहळू दोन्ही टीममधील सदस्य घराबाहेर होऊ लागले. आता ‘ए टीम’मधील निक्की, जान्हवी आणि ‘बी टीम’मधील अभिजीत, अंकिता, धनंजय, पंढरीनाथ, सूरज, वर्षा उसगांवकर असे एकूण आठ सदस्य बाकी राहिले आहेत. जान्हवी ‘ए टीम’ची असली तरी तिने एकट खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता निक्की एकटीच राहिली आहे. असं असलं तरी देखील ती तितकीच खेळताना दिसत आहे. नुकताच निक्की तांबोळीचा एक प्रोमो आला आहे. ज्यामध्ये तिने एक निर्धार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: अरबाज पटेलचा ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यावर मित्राच्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स, शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकला, पाहा

‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निक्की म्हणतेय, “या लोकांसमोर ( बी टीम ) हात जोडायचे नाहीत, म्हटलं होतं ना. यांच्या समोर हात जोडण्या इतपत हे खरंच लायकीचे नाहीयेत. ‘बिग बॉस’ माझं साम्राज्य जरी हललं असेल. तरी मी अजून ती गादी सोडलेली नाहीये. मी लढेल, मी अडेन. पण मी या लोकांसमोर कधीच झुकणार नाही.”

नेटकरी म्हणाले, “निक्की तूच विजेती होणार”

निक्कीच्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एक गोष्ट मात्र खरी आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये निक्की स्ट्राँग खेळाडू आहे.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तूच विजेती होणार.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, निक्की ये बात…तू लढ आम्ही तुझ्याबरोबर आहोत. वाघिणी, तू एकटीच भारी आहेस.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : लग्नाबद्दल विचारताच अरबाज पटेल लाजला अन् म्हणाला, “आता तर…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या नववा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस’ने घरात राहिलेल्या आठही सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठ सदस्यांपैकी कोणत्या सदस्याचा घराबाहेर जाण्यापासून बचाव होतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 nikki tambolis determination i will not bow down to these people pps