Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता फक्त सात सदस्य बाकी राहिले आहेत. १६ सदस्यांनी या घरात प्रवेश केला होता आणि एक वाइल्ड कार्ड होता. असे एकूण १७ सदस्य ‘बिग बॉस’च्या घरात खेळताना पाहायला मिळाले. त्यातील आता फक्त सात सदस्य बाकी राहिले आहेत. या सात सदस्यांमधील कोणता सदस्य बाजी मारतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

रविवार, एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. यामध्ये पंढरीनाथ कांबळे बाद झाला. कमी मतांमुळे पंढरीनाथ ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाबाहेर झाला. यावेळी घराबाहेर जाताना पंढरीनाथने म्युच्युचल फंड कॉइनचा वारसदार म्हणून सूरजला निवडलं आणि एक मोठा निर्णय जाहीर केला. पंढरीनाथ म्हणाला की, माझ्या कॉइनचा वारसदार सूरज चव्हाण असेल. तो माझ्या सगळ्या गोष्टींचा वारसदार असेल आणि मी त्याचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतलं आहे. पंढरीनाथच्या या निर्णयाचं सर्वत्र सध्या कौतुक होतं आहे. अशातच अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारेने पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Video: “पॅडी दादा…”, सूरज चव्हाण पंढरीनाथ कांबळेच्या आठवणीत झाला भावुक; म्हणाला, “मन भरून आलं…”

पल्लवी विचारेने पंढरीनाथ कांबळेचा फोटो शेअर करत लिहिलं, “‘बिग बॉस’चा खेळ खरंच आयुष्य शिकवून जातो नाही, म्हणजे बघा ना एका चांगल्या माणसाला सतत त्याच्या चांगुलपणाचा पुरावा द्यावा लागतो आणि आयुष्यभर तो स्वतःला सिद्ध करतच वेळ घालवतो…आणि तरीही लोक त्याच्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीत. अहो, लोकांचं जाऊदे बऱ्याचदा जन्मदेते आई-बाबा सुद्धा चांगल्या मुलाचीच परीक्षा घेत राहतात कधीच त्याच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत नाहीत.”

पुढे पल्लवीने लिहिलं, “चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते आपण कितीही काही म्हटलं तरी हेच अंतिम सत्य आहे…असंच काहीतरी झालंय पॅडी दादा तुझ्याबरोबर…पण एकच सांगेल तू ट्रॉफी नाही पण सगळ्यांच प्रेम भरभरून जिंकून गेलास…नेहमीप्रमाणेच.”

हेही वाचा – पंढरीनाथ कांबळे ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर जिवलग मैत्रीण विशाखा सुभेदारची पहिली पोस्ट, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पल्लवी विचारेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एकदम खरंय, मी माझ्या आयुष्यात हेच अनुभवत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, खूप चांगला व्यक्ती आहे पॅडी दादा. खूप छान खेळला. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खरंच खूप शांत आणि साधा माणूस…खूप वाईट वाटलं.”

हेही वाचा – लठ्ठपणावरून ट्रोल करणाऱ्यावर अक्षया नाईक संतापली, मुंबई पोलिसांना टॅग करत म्हणाली, “ही व्यक्ती इतकी…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगांवकर या सात सदस्यांपैकी एक सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे.