Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपीही वाढत आहे. स्पर्धकांनी हे पर्व चांगलंच गाजवलं आहे. एकूण १६ स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाले होते. आता ११ स्पर्धक राहिले आहेत. ७ सप्टेंबरच्या भाऊच्या धक्क्यावर घनःश्याम दरवडे एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता हे ११ स्पर्धक काय धुमाकूळ घालतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, दर रविवारी ‘बिग बॉस’च्या घरात आठवड्याभरात काय-काय घडलं? हे सर्व दुपारी १ वाजता प्रसारित होतं. यामध्ये एक्स्ट्रा कल्ला, एक्स्ट्रा ड्रामा आणि एक्स्ट्रा धमाल पाहायला मिळते. १ तासांच्या भागात न पाहिलेल्या गोष्टी देखील ‘आठवड्याचा एक्स्ट्रा कल्ला’मध्ये दाखवल्या जातात. याचाच प्रोमो सध्या चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने दिलेले खास गिफ्ट्स पाहून स्पर्धकांचे डोळे पाणावले, पाहा नवा प्रोमो

या प्रोमोमध्ये एका बाजूला निक्की तांबोळी व अरबाज पटेल गप्पा मारताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, आर्या जाधव आणि सूरज चव्हाण निक्की व अरबाजविषयी बोलत आहेत. याच वेळी अंकिता विचारते की, अरबाजच्या जागी पॅडी दादा असते तर पॅडी दादांनी काय केलं असतं? यावर पंढरीनाथ कांबळे म्हणाला, “दोन दिवसात ब्रेकअप.” त्यानंतर अंकिताने अभिजीतला विचारलं. तेव्हा अभिजीत म्हणाला, “जर ती इथे असती तर ती आयुष्यातच नसती.” मग सूरज त्यांच्या अंदाजात म्हणाला, “तू माझ्यासाठी लय स्पेशल आहेस. हे घे स्पेशल चॉकलेट माझ्या बच्च्या.” त्यानंतर सगळेजण हसू लागले.

हेही वाचा – दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सोशल मीडियावर शेअर केली पहिली पोस्ट, बॉलीवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा होतोय वर्षाव

दरम्यान, शनिवारी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून घनःश्याम दरवडे एलिमिनेट झाला. यावेळी अरबाजसह काही स्पर्धक भावुक झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे एखादा स्पर्धक घराबाहेर झाला तर तो म्युच्युअल फंडच्या कॉइनचा वारसदार म्हणून घरातील स्पर्धकांपैकी एकाला निवडतो. घनःश्यामने म्युच्युअल फंडच्या कॉइन वारसदार म्हणून अरबाज किंवा निक्कीला नव्हे तर सूरज चव्हाणला निवडला. घनःश्यामचा हा निर्णय ऐकून सगळ्यांच धक्का बसला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 pandharinath kamble gave a answer to the question regarding ankita nikki pps