Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये काल ‘बीबी फार्म’चा उर्वरित टास्क दाखवण्यात आला. पण हा टास्क पूर्ण झाला नाही. कारण हा टास्क खेळताना सतत घरातील सदस्यांकडून नियम भंग आणि शक्तीच प्रदर्शन होत होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’ने ‘बीबी फार्म’ टास्क रद्द केला. यावेळी अंकिता वालावलकरला दुखापत झाली. पण यादरम्यान निक्की तांबोळी ज्याप्रकारे खेळली, त्यावरून कलाकार मंडळी संतापले आहेत. सोशल मीडियावर पुन्हा एकदा निक्कीविरोधात पोस्ट लिहित आहेत.

बीबी करन्सी मिळवण्याकरिता दिलेला ‘बीबी फार्म’ टास्कमध्ये शक्ती प्रदर्शनामुळे पहिली फेरी रद्द करण्यात आली. यावेळी ‘बिग बॉस’ने एक शिक्षा दिली. दोन्ही गटातील सदस्यांना विरोधी गटातील एका सदस्याला बाहेर काढायला सांगितलं. अभिजीतच्या टीमने वैभवला तर वर्षा उसगांवकरांच्या टीमने अरबाजला टास्कमधून बाहेर केलं. त्यानंतर पुन्हा टास्क खेळण्यात आला. पण यावेळी निक्की नियमांचं उल्लंघन करून खेळताना दिसली. यावर ‘बिग बॉस’ने तिला थेट न बोलताना टास्क रद्द केला. त्यानंतरही निक्की कुठलीही ट्युटी करायला तयार नव्हती. एकंदरीत निक्की या आठवड्यात ज्याप्रकारे खेळत आहे. तेच काही कलाकारांना खटकलं आहे. त्यामुळे कलाकार मंडळी निक्कीविरोधात बोलत आहेत. यावरून अभिनेत्री प्रणित हाटे भडकली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

हेही वाचा – Video: “वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली…

सब सेटिंग है – प्रणित हाटे

अभिनेत्री प्रणित हाटेने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर लिहिलं की, बिग बॉस हे काय चाललं आहे? निक्कीला एवढा पाठिंबा कसा काय मिळतो? निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे की बिग बॉसने निक्कीला? आणि जो माज तिला आलाय आहे आणि ह्यावर जर रितेश देशमुख काही बोलले नाही तर नक्की आहे सब सेटिंग है.

हेही वाचा – Video: “माज जरा कमी कर”, निक्की तांबोळीवर संतापून सोनाली पाटीलने दिला सल्ला, म्हणाली…

Pranit Hatte Instagram Story

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील पुर्णिमा तळवलकरांचा भाचीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader