Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील जान्हवी किल्लेकर स्पर्धक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. वर्षा उसगांवकरांनंतर पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केल्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी तिला चांगलाच धारेवर धरलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत जान्हवीवर टीका केली जात आहे. पण असं असलं तरी दुसऱ्या बाजूला जान्हवीचा पती किरण किल्लेकरने तिला पाठिंबा दर्शवला आहे. २१ ऑगस्टच्या भागात जान्हवी ढसाढसा रडत पंढरीनाथ कांबळेची माफी मागताना पाहायला मिळाली. पण जान्हवीचं हे नाटक आहे, ती खोटी रडतेय, असे बरेच कलाकार म्हणताना दिसत आहेत. यासंदर्भात लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने आपलं परखड मत मांडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) २१ ऑगस्टच्या भागात घडलेल्या प्रकारावरून जान्हवी रडत पंढरीनाथ कांबळेची माफी मागितली. जान्हवी हात जोडून म्हणाली, “माझं खरंच चुकलं…सॉरी” यावेळी पंढरीनाथने तिला मोठ्या मनाने माफ केलं. पंढरीनाथ तिला समजवत म्हणाला, “मी देवाकडे प्रार्थना केली होती की, देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टॅण्ड घेता यावा की, या माणसाबरोबर मी काम करणार नाही. कारण, मी हे करू शकतो. मी विचारेन कोण-कोण आहे जान्हवी किल्लेकर आहे ना? बॉस मी काम नाही करणार, असं मी ठरवलं होतं. पण, मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे. तर, झालं गेलं राहुदेत त्यामुळे ठिके आता तू रडू नकोस.” पण जान्हवीचं हे माफी मागणं नाटक असल्याचं मराठी कलाकार म्हणत आहेत.

हेही वाचा – “तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok…”, जान्हवीने रडून माफी मागितल्यावर विशाखा सुभेदारने सुनावलं! म्हणाली, “पंढरीनाथ…”

मराठी अभिनेत्री प्रणित हाटेने जान्हवीच्या या माफीवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून जान्हवी नेमकी का रडली? हे प्रणितने सांगितलं आहे. “मी शप्पथ घेतो की, ही मुलगी या संपूर्ण पर्वात कधी सुधारणार नाही”, असं कॅप्शन लिहित प्रणितने व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रणित हाटे नेमकं काय म्हणाली?

या व्हिडीओत रडण्याचा अभिनय करत प्रणित म्हणाली, “हॅलो, नमस्कार…आजचा ‘बिग बॉस’चा भाग पाहिल्यानंतर हा ड्रामा मी करतेय. आज ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) भागाबद्दल मला जास्त काही बोलायचं नाहीये. पण मला एक गोष्ट प्रामुख्याने मला बोलायची आहे. २० ऑगस्टच्या भागात जान्हवीने पंढरीनाथ कांबळे यांना बोलून जो काही त्यांचा अपमान केला आहे ते आता ओव्हर अॅक्टिंगपर्यंत पोहोचलं आहे. मी खात्रीने सांगते, जान्हवीला परवापर्यंत त्या गोष्टीचा अजिबात खेद वाटत नव्हता.”

हेही वाचा – “मुली…तू फक्त वापरली जा…”, बदलापूर प्रकरणावर आस्ताद काळेची मार्मिक पोस्ट, तर जुई गडकरी म्हणाली, “गलिच्छ राक्षस…”

“जेव्हा जान्हवीने अरबाजला राखी बांधली तेव्हा ती त्याला म्हणाली, आय लव्ह यू वगैरे. त्यानंतर जेव्हा अरबाजवर कॅप्टन्सी पद बहाल करण्याची वेळ आली. तेव्हा जान्हवीला आशा होती की, अरबाज तिला कॅप्टन्सी देईल. पण अरबाजने कॅप्टन्सी निक्कीला दिली. त्यामुळे ती भावुक झाली. हाच तिचा इमोशनल बॉन्ड फुटला. ती आतून येडी झाली आणि मग हे कसं दाखवणार या गोष्टीसाठी रडते. त्यामुळे सगळी गाडी वळली पंढरीनाथ दादाकडे. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला असं म्हणाली. जर का तुला इतकं सॉरी म्हणायचं होतं, तर मग तू त्याच दिवशी बोलायचं होतं. तुला त्या दिवशीच कळालं पाहिजे होतं ना. हा सगळा मेलोड्रामा आहे. मगरमच्छ के आंसू आहेत बाकी काही नाही. मुर्ख,” असं प्रणित म्हणाली. ( Bigg Boss Marathi )

दरम्यान, याआधी वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे अभिनेत्री प्रणित हाटे निक्की तांबोळवर भडकल्याचं पाहायला मिळालं. तसंच अरबाज पटेलला ट्रोल करण्यावरूनही तिने भाष्य केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 pranit hatte react on jahnavi killekar apology to pandharinath kamble pps