Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून नुकतंच आर्या जाधवला बाहेर काढण्यात आलं आहे. ‘जादुई हिरा’च्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्की तांबोळीमध्ये वाद झाले. या वादाचं रुपांतर धक्काबुकीमध्ये झाले. यावेळी आर्याचा राग अनावर झाला आणि तिने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ने आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला. पण ‘बिग बॉस’च्या या निर्णयामुळे अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओतून तिने निक्कीच्या आईला सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्याने कानशिलात लगावल्यानंतर निक्कीच्या आईचा व्हिडीओ समोर आला होता. निक्कीची आई प्रमिला तांबोळी म्हणाल्या होत्या की, ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जी घटना घडली, निक्कीवर आर्याने हल्ला केला, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. आम्ही इथे राहून काही करू शकत नाही, पण आम्हाला आमच्या मुलीची काळजी वाटते. ‘बिग बॉस’च्या घरात सारखं सारखं तिच्याबरोबर असं घडतंय. निक्कीच्या आईचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. याच व्हिडीओच्या पार्श्वभूमीवरून मराठी अभिनेत्रीने टीका केली आहे.

हेही वाचा – “आमचा छोटा सुपरहिरो आला…”, मायरा झाली मोठी ताई; श्वेता वायकुळ यांनी गोंडस मुलाला दिला जन्म

मराठी अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?

निक्कीच्या आईला सल्ला देत टीका करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रणित हाटे आहे. प्रणित हाटेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रणित म्हणाली, “आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. निक्कीच्या आईचा तो व्हिडीओ आहे. ज्यामध्ये निक्कीची आई आर्याबद्दल वाईट बोलत आहे; जे काही तिने ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात केलं. माहितीसाठी, मी आर्याच्या समर्थनार्थ बोलत नाहीये. पण मला हे म्हणायचं आहे की, आता आर्याने तुमच्या मुलीला काही केलं म्हणून तुम्हाला राग आला. एवढ्या महिन्यापासून तुमची मुलगी काय करत होती, तेव्हा तुम्ही बोलायला नाही आलात.”

“वर्षाताईंना काय-काय अपशब्द वापरले. पाय पसरून झोपते, हे काय करते, ते सगळं म्हणाली. लोकांची लायकी काढली. लोकांना नाही तसं म्हणाली. ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) माझं घरं आहे. मी राणी आहे, एवढं सगळं बोलून फालतुगिरी करत होती, तेव्हा नाही वाटलं की, आपण येऊन व्हिडीओ बनवला पाहिजे. काहीतरी चुकीचं झालंय. आता तुमच्या मुलीविरोधात झालंय तेव्हा तुम्ही व्हिडीओ केलात. पेहले अपनी औलाद को सुधारो…कळलं…मग सगळ्या गोष्टी मार्गी लागतील,” असं स्पष्टच प्रणित हाटे म्हणाली.

हेही वाचा – ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेता हरीश दुधाडेने भावुक पोस्ट करत म्हणाला, “गेली तीन वर्ष…”

हेही वाचा – Bigg Boss Marathi: संग्राम चौगुले ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…

दरम्यान, प्रणित हाटे नेहमी ‘बिग बॉस मराठी’मध्ये ( Bigg Boss Marathi ) घडलेल्या घटनांवर भाष्य करत असते. याआधी तिने निक्की विरोधात पोस्ट शेअर लिहिली होती. “बिग बॉस हे काय चाललं आहे? निक्कीला एवढा पाठिंबा कसा काय मिळतो? निक्कीने ‘बिग बॉस’ला विकत घेतलं आहे की ‘बिग बॉस’ने निक्कीला? आणि जो माज तिला आलाय आहे आणि ह्यावर जर रितेश देशमुख काही बोलले नाही तर नक्की आहे सब सेटिंग है”, अशा परखड शब्दात तिने आपलं मत मांडलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 pranit hatte reaction on nikki tamboli mother video pps