Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या नववा आठवडा सुरू आहे. पुढचा आठवडा आता शेवटचा आठवडा असणार आहे. कारण ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे आता राहिलेल्या आठ सदस्यांमध्ये चुरसीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी हे आठ सदस्य सध्या खेळताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर दोन सदस्य गेले. वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर झाला. त्यानंतर अरबाजच्या पटेल एलिमिनेट झाला. अरबाज जाण्याने निक्की तांबोळी हतबल झाली होती. ती ढसाढसा रडताना दिसली. पण आता पुन्हा एकदा निक्कीने तिच खरं रुप दाखवायला सुरुवात केली आहे. अरबाज नसला तरी घरातील इतर सदस्यांबरोबर सतत वाद घालताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर तिला आता काम करण्याची इच्छा देखील नसल्याचं तिनं व्यक्त केलं. निक्कीच्या याच एकंदरीत स्वभावावरून मराठी अभिनेत्रीने एक मार्मिक अशी पोस्ट करत रितेश देशमुखला सल्ला दिला आहे.

हेही वाचा – आलिया भट्टने ऐश्वर्या राय-बच्चनला फोटोमधून केलं क्रॉप? नेटकऱ्यांची राहाच्या आईवर टीका, पण सत्य काय?

रितेश देशमुख सल्ला देणारी ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून प्रणित हाटे आहे. अभिनेत्री प्रणित हाटे ‘बिग बॉस मराठी’ सुरू झाल्यापासून त्यावर परखड मत मांडताना दिसत आहे. अशाप्रकारे तिने पुन्हा एकदा परखड मत मांडलं आहे. प्रणित हाटेने इन्स्टाग्राम स्टोरीवर सलमान खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वाचा आहे. या पर्वात निक्की तांबोळी सहभागी झाली होती. प्रणितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निक्कीने राखी सावंतचा बेड साफ करण्यास नकार दिल्यामुळे सलमान खान तिला एका कृतीतून सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.

या व्हिडीओत, एजाज सलमान खानला सांगतोय की, निक्कीने राखीचा बेड साफ करणार नाही, असं म्हटलं आहे. तेव्हा सलमान निक्कीला विचारतो, “असं का? राखी या घरात राहत नाहीये का?” त्यावर निक्की म्हणते, “मला तिला दुर्लक्ष करायचं आहे. त्यामुळे मी नाही केलं.” हे ऐकून सलमान म्हणाला की, तुला जर दुर्लक्ष करायचं आहे. तर तू तिला कसंही दुर्लक्ष करू शकते. तिचा बेड साफ करायला काय अडचण आहे? निक्की म्हणते, “मला करायचं नव्हतं.” यावर सलमान म्हणतो, “तुला हे नाही करायचं? ही तुझी ड्युटी आहे की नाही?” तेव्हा निक्की म्हणते, “आहे.” त्यानंतर सलमान विचारतो, “तू ही ड्युटी व्यवस्थितरित्या केली?” त्यावर निक्की म्हणते, “हो केली. पण तिचा बेड साफ केला नाही.” सलमान हे ऐकून संतापतो. तिला म्हणतो, “तुला बेड साफ नाही करायचा. ठीक आहे. थांबा मी येतोच.”

हेही वाचा – ऐश्वर्या राय-बच्चनची भाची नव्या नवेली नंदाला आलिया भट्टचं कौतुक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “थोडं मामीला पण…”

त्यानंतर सलमान खान स्वतः ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन राखी सावंतचा बेड साफ करतो आणि व्यवस्थित लावतो. तेव्हा राखी नको नको म्हणत असते. तसंच ती सलमानची माफी देखील मागते. पण निक्की फक्त बघतच बसलेली असते. त्यानंतर सलमान राखीचा बेड नीट आवरून झाल्यावर म्हणतो, “कोणतही काम कमीपणाचं नसतं. जर हिच गोष्ट चित्रपटात किंवा मालिकेत करायला मिळाली असती तर तुम्ही फुल्ल परफॉर्मन्सने केली असती.” सलमानचा हाच व्हिडीओ पोस्ट करत प्रणितने रितेश देशमुखला सल्ला दिला आहे.

प्रणित हाटेने लिहिलं आहे, “सलमान खानकडून रितेश सरांनी काहीतरी शिकावं, अशी माझी इच्छा आहे. आणि महेश सर शप्पथ….याला म्हणतात माज उतरवणं.” प्रणित हाटेची या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Pranit Hatte Instagram Story

दरम्यान, या आठवड्यात सर्व आठही सदस्यांना ‘बिग बॉस’ने नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे आठ सदस्यांपैकी कोणता सदस्य शेवटच्या आठवड्यात घराबाहेर होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.