Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या दोन आठवड्याप्रमाणे तिसरा आठवडा देखील राड्याने सुरू झाला आहे. हा राडा निक्की तांबोळी व पंढरीनाथ कांबळे यांच्यात झाला आहे. आपल्या वस्तूंना हात लावल्यामुळे निक्की पंढरीनाथ कांबळेसह अंकिता वालावलकर, धनंजय पोवार यांच्याशी भांडतानाचा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे. अशातच पहिल्या आठवड्यात बेघर झालेले पुरुषोत्तम दादा पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे; जी सध्या तुफान व्हायरल होतं आहे.
दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पुन्हा एकदा सगळ्यांची शाळा घेतली. दोन्ही गटातील स्पर्धकांची चांगलीच कान उघडणी केली. यावेळी निक्की तांबोळी प्रमाणे जान्हवी किल्लेकरचा रितेशने चांगलाच समाचार घेतला. वर्षा उसगांवकरांचा केलेला अपमान यावरून रितेशने थेट जान्हवीला घराबाहेर काढण्याची धमकीचं दिली. असं असलं तरी दुसऱ्या बाजूला रितेश काही स्पर्धकांचं कौतुक देखील केलं. पण या आठवड्यात कोणीच घराबाहेर गेलं नाही. ( Bigg Boss Marathi )
हेही वाचा – तेव्हा रमेश देव यांनी सोडली सिगारेट, अजिंक्य देव प्रसंग सांगत म्हणाले, “एकेकाळी बाबा चेन स्मोकर होते…”
योगिता चव्हाण, घन:श्याम दरवडे (छोटा पुढारी), पंढरीनाथ कांबळे, निखिल दामले, सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे सहा सदस्य दुसऱ्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. पण यामध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. ‘कलर्स मराठी’ एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याने सगळ्या घरातील सदस्यांना या एलिमिनेशनपासून सुटका देण्यात आली. पण दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेट असलेले सहा स्पर्धकच पुढच्या (तिसऱ्या) आठवड्यासाठी नॉमिनेट असणार आहेत. पहिल्या आठवड्यात बेघर झालेले पुरुषोत्तमदादा पाटील यांनी “अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती”, असं मत व्यक्त केलं हे. ( Bigg Boss Marathi )
पुरुषोत्तमदादा पाटील यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मला बिग बॉसच्या ( Bigg Boss Marathi ) घरात अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती. तुम्हाला काय वाटतं अवश्य सांगा.” ही पोस्ट त्यांनी ‘कलर्स मराठी’सह वृत्तवाहिन्यांना टॅग केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे.
हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार भजनाची तालीम कशी करतात पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
“दादा सोन्या चांदीचं मोल फक्त सोनारालाच समजतं लोखंड घेणाऱ्याला नाही समजू शकतं”, “हो नक्कीच दादा…तुम्ही अतिशय उत्तम खेळत होता”, “हो तुम्हाला संधी भेटायला पाहिजे होती. आम्हाला बघायचं होतं”, अशा अनेक प्रतिक्रिया पुरुषोत्तमदादा पाटील यांच्या चाहत्यांनी पोस्टवर दिल्या आहेत.