Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा चौथा आठवडा जबरदस्त सुरू झाला आहे. याआधीच्या आठवड्याप्रमाणेच चौथा आठवडा देखील वाद, राड्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्यात ‘बिग बॉस’ने पहिला टास्क ‘सत्याचा पंचनामा’ दिला आहे. या टास्कमध्ये दोन टीम आहेत. या टीममधील सदस्यांना सत्याचा पंचनामा करायचा आहे. याच टास्क दरम्यान पुन्हा एकदा निक्की तांबोळी व अरबाज पटेलमध्ये जोरदार भांडण झाल्याचं समोर आलं आहे. एकमेकांवर जोरजोरात ओरडून आदळआपट करताना निक्की व अरबाज दिसत आहेत. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एका मराठी अभिनेत्याने अरबाजच्या या कृत्यावर निषेध नोंदवला आहे.

‘सत्याचा पंचनामा’ टास्कमध्ये एक पंचनामा खोली आहे. त्या खोलीमध्ये दोन्ही टीममधील एक-एक सदस्याला पाठवून त्या सदस्यासंबंधित ‘बिग बॉस’कडून ( Bigg Boss Marathi ) एक विधान केलं जात आहे. त्या सदस्याने ते विधान खरं की खोटं हे सांगायचं. त्याच वेळेला विरोधी टीमने ठरवायचं आहे की, पंचनामा खोलीत असलेला सदस्य खरं बोलतं आहे की खोटं? यासाठी विरोधी टीममध्ये आपापसात चर्चा करायची आहे. जर विरोधी टीम पंचनामा खोलीत असलेल्या सदस्याच्या मताशी सहमत असेल तर त्यांनी ते जाहीर करून हिरवा बजर दाबायचा आहे. सहमत नसतील तर लाल बजर दाबायचा आहे. 

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीच्या निर्णयामुळे ‘ए’ टीममध्ये पडली फूट, वैभव-घनःश्यामने उठवला आवाज, म्हणाले, “हिच्या वागण्यामुळे टीमचा घात”

पण यात एक ट्विस्ट आहे. जर विरोधी टीम पंचनामा खोलीत असलेल्या सदस्याशी सहमत असेल तर त्या सदस्याच्या टीमला २० हजार बीबी करन्सी मिळणार. जर विरोधी टीम पंचनामा खोलीतील सदस्याशी सहमत नसेल तर तो सदस्य रिकाम्या हाती बाहेर येत आहे. आतापर्यंत दोन्ही टीममधील एक-एक सदस्य गेले होते जे रिकाम्या हाती बाहेर आलेत. आजच्या भागात निक्की त्या खोलीत जाणार आहे. यावेळी तिला बिग बॉस ( Bigg Boss Marathi ) विचारतात की, चूक झाल्यावर तुम्ही मनापासून माफी मागत नाही खरं की खोटं? यावर निक्की म्हणते “हे अत्यंत खोटं आहे.” तिच्या उत्तरावर विरोधी ‘बी’ टीममधील सदस्य सहमती दर्शवत नाहीत. त्यामुळे घरात पुन्हा कल्ला होता.

निक्की बाहेर येऊन ‘बी’ टीममधील अभिजीतला जाब विचारते. यामुळे अरबाज संतापतो आणि दोघांमध्ये जोरदार भांडण होतं. दोघंही गार्डन परिसरात एकमेकांवर जोरजोरात ओरडून आणि आदळआपट करून भांडतात. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हाच प्रोमो पाहून ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकलेला पुष्कर जोगने ( Pushkar jog ) अरबाज विरोधात निषेध दर्शवला आहे.

पुष्करने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं आहे, “बायकांना हडतूड करणारे, त्यांच्यावर केकाटणारे मर्द, पुरुष यांचा मी निषेध करतो. आपल्या समाजामध्ये हे सामान्य (नॉर्मल) आहे असा समज आहे…पण तेच सर्वात घातक आहे…घरातल्या इतरांनी स्टँड घ्या…प्रत्येक स्त्री आपल्या आई आणि बहिणीसाठी आहे. #अरबाज bbm5 #जोगबोलणारच…प्रिय सदस्य, हा कार्यक्रम खूप भारी आहे. तो नीट खेळा.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सातव्या वर्षात पदार्पण, कलाकार खास पोस्ट करत म्हणाले, “अजून ही हवेत न उडता..”

दरम्यान, याआधी पुष्कर जोगने ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात चालेल्या घडामोडींवर परखड मत मांडलं होतं. निक्की तांबोळीच्या वागण्यावर पुष्करने टीका केली होती.

Story img Loader