Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पाचवा आठवडा देखील दणक्यात पार पडला. या आठवड्यात मानकाप्यामुळे सदस्यांच्या जोड्या पाहायला मिळाल्या. निक्की तांबोळी -अभिजीत सावंत, अरबाज पटेल – आर्या जाधव, जान्हवी किल्लेकर – सूरज चव्हाण, वैभव चव्हाण – धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे – छोटा पुढारी घन:श्याम, वर्षा उसगांवकर – अंकिता वालावलकर अशा जोड्यांनी या आठवड्यातील टास्क खेळले गेले. यावेळी आर्या अरबाजची जोडी असल्यामुळे सतत ती निक्कीबद्दल बोलताना दिसली. एवढंच नव्हेतर कालच्या भागात देखील अरबाजने काचेवर हृदय काढल्यानंतर सगळ्या घरातील सदस्यांना ती चुगली करताना पाहायला मिळाली. यामुळे आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आर्याची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं आहे.
आजच्या भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो नुकताच ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख आर्याला चांगलंच सुनावताना दिसत आहे. “तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही”, असं थेट विधान रितेशने आर्यासाठी केलं आहे.
हेही वाचा – Video: “तुम्हाला झालेला त्रास खोटा अन्…”, रितेश देशमुखने घेतली अरबाजची शाळा, चक्रव्यूह रूम उघडून केली पोलखोल
प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख आर्यावर संतापून म्हणतोय की, तुमचा गेम निक्की शिवाय दिसत नाही. त्यानंतर आर्या म्हणते, “निक्की प्रोब्लेम क्रिएट करते. आम्ही त्याच्यावर रिअॅक्शन देतो.” आर्याचं हे वाक्य ऐकून रितेश म्हणतो, “आम्ही नाही. तुम्ही स्वतःबद्दल बोला.” त्यावर आर्या म्हणते, “निक्की माझा गेम नाहीये.” तेव्हा रितेश म्हणतो, “तुम्हाला असं वाटतं, तुमचा गेम नाहीये. आता तुम्ही जे दिसताय ना ते फक्त निक्कीच्या रिअॅक्शनवर दिसताय. तर मला इथे सांगू नका तुम्ही कसे दिसताय.”
दरम्यान, रितेशच्या भाऊच्या धक्क्याच्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “रितेश भाऊ एक नंबर”, “बरोबर भाऊ”, “खरंच आर्याला काहीच अक्कल नाही. यांना साधा टास्क समजत नाही”, “रितेश देशमुख अगदी बरोबर बोललात. कंटेन्ट क्रिएटर असूनही सगळे फक्त निक्की निक्की करत आहेत. यांना कोणालाच स्वतःचा काहीच कंटेन्ट क्रिएटर करता येत नाहीये”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.