Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दणक्यात सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला काहीना काहीतरी घडताना दिसत आहे. सातव्या आठवड्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. पण या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एक निंदनीय घटना घडली. कॅप्टन्सी टास्कदरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यामुळे सध्या घरातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर आर्याला तात्पुर्ती जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिल्यानंतर आता ‘भाऊच्या धक्क्या’वर कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. आर्याला आता कोणती शिक्षा दिली जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्या व्यतिरिक्त घरातील सर्व सदस्यांना रितेश देशमुख जागं करताना पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘भाऊच्या धक्क्या’चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुखने सर्व सदस्यांना एका गाण्याद्वारे जागं आणताना दिसत आहे. यावेळी सर्व सदस्यांना देखील आश्चर्याचा धक्काच बसला. नेमकं काय घडणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला.

हेही वाचा – “आपला पॅडी का रडला?” याचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा किस्सा, म्हणाली, “हा माणूस…”

Bigg Boss Marathi Season 5 (Photo Credit – Colors Marathi)

या प्रोमोमध्ये, रितेश देशमुख सर्व सदस्यांना म्हणतो की, या घरात रोज एक वेकअप साँग वाजतं. मी रोज टीव्हीवर पाहतो. पण आज मला हे लाइव्ह पाहायचं आहे. मी आता एक गाणं वाजवणार आहे आणि सगळ्यांनी तो वेकअप डान्स करायचा आहे…चला सगळे उठा…काय सूरज तयार एकदम. चला लावा गाणं. त्यानंतर ‘हीच आमची प्रार्थना’ हे गाणं लावलं जातं.

हे गाणं ऐकून सर्व सदस्य चकीत होतात. यावेळी सूरज हात जोडताना दिसत आहे. तर काही सदस्य मान खाली करून उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. गाणं झाल्यावर रितेश देशमुख विचारतो, “काय? एनर्जी नाही? डान्स नाही? हे वेकअप साँग नव्हतं. हा वेकअप कॉल होता.”

हेही वाचा – Video: “मिस्टर इंडिया”, म्हणत रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची केली कानउघडणी, म्हणाला, “या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर…”

दरम्यान, ‘भाऊच्या धक्क्या’च्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “माणुसकी फक्त सूरज आणि अंकिताने दाखवली, असं कोणाला वाटतं?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, जबरदस्त. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “माणुसकी फक्त सूरजकडे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 riteish deshmukh have a wakeup call to all the contested through a song pps