Bigg Boss Marathi Season 5 : गेल्या आठवड्यात भाऊच्या चक्रव्यूह रूममुळे निक्की ‘ए’ टीममधून बाहेर पडली. ‘ए’ टीममधील कुठल्याही सदस्याला ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकू देणार नाही, असा तिने थेट दावाच केला. त्यानंतर हा संपूर्ण आठवडा जोड्यांनी खेळला गेला. यावेळी निक्की-अभिजीत या जोडी विरोधात संपूर्ण घर पाहायला मिळालं. यावरूनच आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अरबाजसह सगळ्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. तसंच घरच्यांसाठी चक्रव्यूह रूम उघडून अरबाजची पोलखोल केली जाणार आहे. नुकताच आजच्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आठवड्याच्या सुरुवातीलाच ‘बिग बॉस’ घरात मानकाप्याची एन्ट्री झाली. मानकाप्यापासून बचाव करण्यासाठी सगळ्या सदस्यांच्या जोड्या करण्यात आल्या. तसंच आठवडाभर घरात एकट्याने फिरण्यास मनाई करण्यात आली. निक्की-अभिजीत, अरबाज पटेल – आर्या जाधव, जान्हवी किल्लेकर – सूरज चव्हाण, वैभव चव्हाण – धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे – छोटा पुढारी घन:श्याम, वर्षा उसगांवकर – अंकिता वालावलकर अशाप्रकारे जोड्या पाहायला मिळाल्या. पण आठवडाभर निक्की-अभिजीत विरुद्ध सगळे सदस्य असं चित्र निर्माण झालं. यावेळी अरबाजने निक्की दूर गेल्यामुळे स्वतःला खूप त्रास होतं असल्याचं दाखवलं. पण काही दिवसांत दोघं परत एकत्र आले. पण आठवड्याभरातील एकंदरीत अरबाजच्या वागण्यावरून रितेश आज त्याची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठी (फोटो सौजन्य – कलर्स मराठी)

हेही वाचा – Video: “मम्मा, तू चुकीचा चित्रपट बनवला…” ‘काकण’ची कथा ऐकून क्रांती रेडकरच्या मुली ढसाढसा लागल्या रडू, म्हणाल्या…

भाऊच्या धक्क्याच्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतोय की, प्रेक्षकांना दोन इंडिव्हिजवल माणसं आणि १० जणांची टोळी दिसत होती. या टोळीचे म्होरके अरबाज पटेल होते. तुम्हाला झालेला त्रास खोटा, तुम्हाला आलेला रागही खोटा. म्हणून सगळ्यांचे डोळे उघडण्यासाठी मी चक्रव्यूह रुम उघडतोय. त्यानंतर प्रोमोच्या शेवटी अभिजीत म्हणतो, “कान लाल झाला का?” त्यामुळे आता चक्रव्यूह रुममध्ये नेमकं अरबाजच्या बाबत काय दाखवलं आहे? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: डॅडींनी तुळजाचं लग्न लावलं सूर्याशी अन्…, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत आला मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो

दरम्यान, रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरबाजचं पितळ उघडं पडलं”, “आम्ही याचीच वाट बघत होतो”, “आता येणार मजा”, “बरोबर, भाऊ सगळ्याला घराला अरबाजने पागल करून ठेवलंय. काही प्रेम वगैरे नाही. फक्त अरबाजला अटेंशन हवंय”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 riteish deshmukh target to arbaz patel pps