Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पाचवा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे. मानकाप्याची घरात जबरदस्त एन्ट्री झाली आहे. मानकाप्यापासून वाचण्याकरिता घरातील सदस्यांच्या जोड्या करण्यात आल्या आहेत. अभिजीत-निक्की, अरबाज पटेल – आर्या जाधव, जान्हवी किल्लेकर – सूरज चव्हाण, वैभव चव्हाण – धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे – छोटा पुढारी घन:श्याम, वर्षा उसगांवकर – अंकिता वालावलकर या जोड्या आठवडाभर पाहायला मिळणार आहेत. अशातच नॉमिनेश टास्क देखील सुरू झाला आहे. आतापर्यंत निक्की, जान्हवी आणि अंकिताने नॉमिनेशन प्रक्रियेत आपली मत नोंदवली आहेत. यामधील अंकिताने केलेल्या नॉमिनेशने अनेकांचा धक्का बसला आहे. अंकिताने वैभव व धनंजयच्या जोडीला नॉमिनेट केलं आहे. भाऊ मानणाऱ्या धनंजयाला अंकिताने नॉमिनेट केल्यामुळेच अनेकांना धक्काच बसला आहे. अभिनेत्री सोनाली पाटीलने यावर आपली संतप्त भावना व्यक्त केली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) तिसऱ्या पर्वात अभिनेत्री सोनाली पाटील झळकली होती. याच पर्वानंतर सोनाली अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. नुकताच तिने धनंजय पोवारच्या समर्थनार्थ व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने अंकितावर टीका केली आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा – Video: वर्षा उसगांवकर ‘या’ सदस्याला म्हणाल्या सेक्सी, अरबाजने सांगितला घरच्यांना किस्सा, पाहा व्हिडीओ

सोनाली पाटील म्हणाली, “काल नॉमिनेशनचा टास्क झाला. या टास्कमध्ये अंकिता आली. अंकिता ठीक आहे, तुला जान्हवीबद्दल खूप सारं प्रेम आहे. काही प्रोब्लेम नाही. सुरजबद्दल तुला खूप प्रेम आहे. तर ते आम्हाला सुद्धा आहे. पण मला हे कळतं नाही, ज्यावेळेला दोन व्यक्ती नॉमिनेशनमध्ये टाकायच्या आहेत. त्यावेळेला तू डीपी दादा आणि वैभवला टाकलं. तुला वैभव आवडत नाही ठीक आहे. काही हरकत नाहीये. पण डीपी दादाला का? मला असं वाटतंय, डीपी दादा वैभवच्या जोडीला आहेत म्हणून त्या दोघांना नॉमिनेशनमध्ये टाकणं रद्द करू शकली असतीस. कारण डीपी दादाचं तुझ्यावरती प्रेम आहे. तुमच्या दोघांमधलं बहीण भावाचं नातं घरातही आहे आणि घराबाहेरही आहे. थोडं पक्षपाती असणं गरजेचं असतं.”

आम्ही सगळेजण डीपी दादाबरोबर आहोत – सोनाली पाटील

“डीपी दादाने तुझा पहिल्यापासून स्टँड घेतला आहे. प्रत्येक चर्चेत तो तुला समजवत असतो, सुचवतं असतो. तिकडे तुझा तो भाऊ आहे. पाठिराखा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तू गेम खेळतेस आणि आता तू त्याच्याबरोबरही गेम खेळतेस. मला हे अजिबात पटलेलं नाही. तू तिकडे घनःश्याम, पॅडी दादा अजून बऱ्याच जोड्या होत्या. त्यांना तू नॉमिनेट करू शकली असतीस. कारण काय देतेस वैभवचं आहे म्हणून, ठिक आहे. पण डीपी दादाने वाटतं पुढे जाऊन खेळावं म्हणजे काय? आता सुद्धा तो खेळतोय. फक्त एक मुद्दा यावा लागतो जिकडे लोकं जास्त ओळखतात. तो आता जरी नॉमिनेशनमध्ये गेला तरी तो १०० टक्के वाचणार. आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर आहोत. पण अंकिताचा हा निर्णय मला अजिबात आवडलेला नाही,” असं स्पष्ट सोनालीने सांगितलं. ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा – Video: दहीहंडीमुळे एजे-लीलाच्या नात्यात प्रेमाचा रंग बहरणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नेमकं काय घडणार? वाचा..

हेही वाचा – Video: आजपासून सुरू होणार तुळजाचा लग्नसोहळा, सूर्याने दिलं आमंत्रण; पण तुळजा कोणाशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थ की सत्यजितशी?

दरम्यान, आज कोण-कोण ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार हे स्पष्ट होईल. कारण निक्की, जान्हवी, अंकिता व्यतिरिक्त इतर सदस्यांची मत देणं अजून बाकी राहिलं आहे. आजच्या भागात नॉमिनेशन टास्कची प्रक्रिया पूर्ण होईल.

Story img Loader