Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक निक्की तांबोळी नेहमी चर्चेत असते. कधी वादग्रस्त विधानामुळे तर कधी चुकीच्या खेळामुळे चर्चेत असते. मंगळवारच्या ३ सप्टेंबरच्या भागात देखील निक्की पंढरीनाथ कांबळे व वर्षा उसगांवकरांचा अपमान करताना पाहायला मिळाली. अशातच निक्कीच्या वागणुकीवरून अभिनेत्री सोनाली पाटीलने तिला फटकारत मोलाचा सल्ला दिला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) तिसऱ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री सोनाली पाटीलने नुकताच व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली म्हणतेय, “कालच्या ( ३ सप्टेंबर ) भागात निक्की कुठल्या परिस्थितीमध्ये कुठलीही ड्युटी करायला नकार देत होती. याचं कारण आर्याने पण सांगितलं आहे. निक्की नॉमिनेशनमध्ये आली आहे आणि खरंच ती नॉमिनेशनला घाबरते. का घाबरते हे माहित नाही. पण ती घाबरते. त्यामुळे तिने वर्षा ताईंना सांगितलं, मी ही ड्युटी करणार नाही. ती ड्युटी करणार नाही. ठीक आहे.”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

हेही वाचा – ‘झिम्मा २’नंतर हेमंत ढोमेचा लवकरच येणार नवा चित्रपट, अभिनेत्याने स्वतःच्या गावात अन् शेतात केलंय चित्रीकरण

“पण एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळेला ती असं म्हणत होती की, मी वॉशरूमची ड्युटी अजिबात करणार नाही. ती एवढे दिवस करत होतीच. तरीही ती म्हणाली, मी हे करणार नाही, ते करणार नाही. शिवाय ती बोट दाखवून म्हणत होती ना, मी टिश्यू असा किंवा तसा करणार नाही. निक्की तुला एक गोष्ट सांगते, जे प्रेक्षक डोक्यावर घेतात ना तेच प्रेक्षक डोक्यावरून खाली सुद्धा खेचतात. तू जे बोट करून बोललीस ना मी टिश्शू असा तसा करणार नाही. तू नॉमिनेशनमध्ये आली आहे आणि नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर जेव्हा त्याच बोटांनी तुला प्रेक्षक एलिमिनेट करतील तेव्हा तू घराबाहेर असशील. त्यामुळे हा माज जरा कमी कर. प्रेक्षक हे प्रेक्षक आहेत,” असं सोनाली पाटील म्हणाली.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ने निक्कीसाठी चहा बनवण्याचे आदेश देताच जान्हवी म्हणाली, “थोडी अक्कल किसून….”, नेमकं काय घडलं?

हेही वाचा – Video: ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतील पुर्णिमा तळवलकरांचा भाचीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

या आठवड्यासाठी कोण नॉमिनेट झालं?

दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader