Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील गाजलेला आणि अधिक पाहिला जाणारा ‘भाऊचा धक्का’ सध्या रितेश देशमुख शिवाय सुरू आहे. कामानिमित्ताने परदेशात असल्यामुळे रितेशची जागा डॉ. निलेश साबळेने घेतली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश गैरहजर आहे. पण या गैरहजेरीत अनेक पाहुणे ‘बिग बॉस’ घरात उपस्थित राहत आहेत.

शनिवारी ( २८ सप्टेंबर ) ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील अभिजीत बिचुकले, पहिल्या पर्वातील पत्रकार अनिल थत्ते आणि चौथ्या पर्वात गाजलेली राखी सावंत हे खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या खास पाहुण्यांनी आपापल्या शैलीत कोणाचं कौतुक केलं तर कोणाची कानउघडणी केली. एकप्रकारे सदस्यांना आरसा दाखवण्याचं काम या खास पाहुण्यांनी केलं, असं म्हणायला काही हरकत आहे. आजच्या ( २९ सप्टेंबर ) ‘भाऊच्या धक्क्या’वरही खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा – Video : ‘नगं थांबू रं…’, मनाला भिडणारं ‘पाणी’ चित्रपटातील शीर्षकगीत प्रदर्शित, पाहा

‘फुलवंती’ चित्रपटातील कलाकार अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी ‘बिग बॉस’ घरात प्रवेश करणार आहेत. यावेळी सदस्यांबरोबर ते विविध खेळातून धमाल-मस्ती करताना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘पाणी’ चित्रपटातील आदिनाथ कोठारे आणि सुबोध भावे देखील ‘बिग बॉस’ घरात खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकताच त्यांचा प्रोमो समोर आला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit - Colors Marathi )
Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit – Colors Marathi )

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये ‘पाणी’ चित्रपटाचा दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे आणि सुबोध भावे यांची ‘बिग बॉस’च्या घरात दमदार एन्ट्री होताना दिसत आहे. त्यानंतर सुबोध भावे सूरज चव्हाणची हुबेहूब नक्कल करताना पाहायला मिळत आहे. सुबोध भावेने सूरजची केलेली नक्कल पाहून सर्व सदस्यांचं हसू अनावर झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : कोकण कन्या अंकिता वालावलकरने मुंबईत ‘या’ ठिकाणी केली होती पहिली नोकरी, किती होता पगार? जाणून घ्या…

प्रोमोमध्ये, सूरज सुबोध भावेला आपले लोकप्रिय डायलॉगबाजी शिकवताना दिसत आहे. यावेळीच सुबोधने सूरजची हुबेहूब नक्कल केली आहे. “तू माझ्या दिलाची परी, तुझ्या गालावर खळी, ऐ बच्च्या तुझाचं मी बाहुबली”, असं म्हणताना सुबोध भाव दिसत आहे. यानंतर सुबोध आणि आदिनाथ दोघं मिळून सूरजचा लोकप्रिय डायलॉग म्हणताना पाहायला मिळत आहेत. पण सुबोधने सूरजची केलेली नक्कल याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सुबोध भावेलाही सूरजने लावलं वेड, पाहा

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एक नंबर”, “सुबोध एकदम कडक…”, “आपल्या सूरज भावाने महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकारांना वेड लावलं बुवा…”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Story img Loader