Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील जबरदस्त पार पडला असून आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. या सातव्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड एन्ट्री होणार आहे. रविवार झालेल्या भाऊच्या धक्क्यावर वाइल्ड एन्ट्रीची ओळख झाली. त्यानंतर आज हा वाइल्ड कार्ड स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन राडा करणार आहे.

कोल्हापुरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर संग्राम चौगुले यांची वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे. पण घरातील स्पर्धकांना आजच्या भागात वाइल्ड कार्ड एन्ट्रीबाबत खुलासा होणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री येण्याची कल्पना बिग बॉसने ( Bigg Boss Marathi ) घरातील स्पर्धकांना दिली आहे. त्यामुळे स्पर्धक अनेक तर्क-वितर्क लावताना दिसत आहेत. अशातच सूरच चव्हाण, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण यांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Colors marathi Pinga Ga Pori Pinga and #Lai Aavdtes Tu Mala mahaepisode
सरकार-सानिकाच्या प्रेमावर पंकजा आणणार ‘संक्रांत’ तर पिंगा गर्ल्स बुलबुल बाग वाचवण्यासाठी…; एक तासाच्या विशेष भागात काय घडणार? वाचा…

हेही वाचा – लवकरच दोन लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कोणत्या जाणून घ्या…

‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम चॅनलवर ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये वैभव सूरज चव्हाणचं म्हणणं अंकिताला सांगतो की, ऐ अंकिता, कोणी तरी पोरगी आली तर मजाच आहे, असं सूरज म्हणतोय. यावर अंकिता म्हणते, “बाबा तू चुकीचं गेम समजतोय. तू जरा थंड घे.” त्यानंतर निक्की म्हणते, “मी तुझ्या सपोर्टमध्ये आहे.” मग अंकिताच्या बाजूला बसलेला अरबाज सांगतो की, “बघा कसा लाजतोय?”

पंढरीनाथ कांबळेची काय प्रतिक्रिया होती?

यानंतर अंकिता पॅडी दादाला बोलावते आणि मालवणीत सांगते, “पॅडी दादा, पहिल्यांदा इकडे या. याला समजवता समजवता हा चुकीचा गेम समजू लागला आहे. आता मगापासून म्हणतायत कोणतरी आज येणार आहे. तर हा म्हणतोय, कोणतरी पोरगी यायला पाहिजे. याच काय करायचं?” यानंतर वैभव पॅडी दादाला सांगतो की, बघा कसा लाजतोय. शेवटी पंढरीनाथ सूरज चव्हाण जवळ जाऊन म्हणतो की, मग इतके दिवस मी काय करत होतो. त्यानंतर निक्की म्हणते, “याला कोण तरी मैत्रीण पाहिजे म्हणतोय.”

पंढरीनाथ सूरज चव्हाण विचारतो की, पोरगी आली तर पटवणार का? सूरज म्हणतो, “हो.” तितक्यात धनंजय पोवार उठतो आणि म्हणतो, “जर आज पोरगी आली तिच्याबरोबर मी तुझं प्रेम प्रकरण पूर्ण करून देतो.”

हेही वाचा – Video: गणपती विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा जबरदस्त डान्स, दोघेही ढोल-ताशांच्या गजरात झाले तल्लीन

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहेत. नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अरे बाबा तुमच्याबरोबर सूरज चव्हाण मजाक करतोय’, असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. तसंच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader