Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २८ जुलैपासून सुरू झालेलं हे पर्व ७० दिवसांत संपत आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यामुळे अंतिम आठवड्यात तिकीट-टू-फिनाले, पार्टी, मिडवीक एलिमिनेशन हे सगळं काही पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतिम आठवड्याच्या सुरुवातीलाच तिकीट-टू-फिनालेचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये निक्की तांबोळीने बाजी मारली. त्यामुळे ती ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. लवकरच घरात मिडवीक एलिमिनेशन होणार आहे. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर यांच्यापैकी एका जणाची अंतिम फेरीपर्यंत जाण्याची संधी हुकणार आहे. त्यामुळे आता घराबाहेर जाणारा सदस्य कोण असणार आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशातच सूरजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सूरज त्याच्या लग्नाचं प्लॅनिंग निक्की आणि अभिजीतला सांगताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: “अरबाजने सॉरी म्हटल्यावर लगेच तू त्याच्या गळ्यात पडणार” म्हणत सूरजने निक्कीला लगावला टोला अन् लावली ट्रॉफीची पैज

‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर सूरजचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज निक्की, अभिजीतला म्हणतो की, छोट्या पद्धतीने लग्न करायचं आहे. जास्त पण मोठ्या पद्धतीने नाही. देवी मरीमातेच्या देवळात एकमेकांच्या गळ्यात हार घालायचं…बसं झालं. त्यानंतर निक्की म्हणते, “हळदी पाहिजे…तुला हळदी लावायचं ना.” यावर सूरज म्हणतो, “खेळ तर असणारच. हळदीचा, सुपारीचा…त्याशिवाय मजा कशी येणार…एक परात असते त्यात पाणी टाकायचं. मग त्यातली सुपारी दोघांनी शोधायची.” हे ऐकून निक्की म्हणते, ” बाईईईई…लाजला हां”

पुढे सूरज निक्कीला तिच्या लग्नाविषयी विचारतो. तो म्हणतो, “तू कधी करतेय?” निक्की म्हणते की, करेल…तुला बोलवेल. सूरज विचारतो,”कधी?” तेव्हा निक्की म्हणते, “आता कधी मला काय माहित” नंतर सूरज म्हणतो, “तुझं आता वय झालं.” यावर निक्की म्हणते, “वयाचं असं काही पण नाही…कधीपण करेन… मला सध्या तरी आई-बाबांबरोबर राहायचं आहे.” मग सूरज विचारतो की, घर जावई करणार का? निक्की विचारते, “घर जावई म्हणजे?” अभिजीत सांगतो, “घर जमाई..म्हणजे तुझ्याच घरी तुझा नवरा राहणार.” निक्की म्हणते की, जिथे पण लग्न करेन तिथे मी माझ्या आई-बाबांबरोबरचं राहिन. म्हणजेच घर जावईचं होईल.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर आणि मेघा धाडेची धमाल-मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुमची मैत्री…”

दरम्यान, मिडवीक एलिमिनेशनमध्ये एकाबाजूला अंकिता वालावलकर घराबाहेर गेल्याचं म्हटलं जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला वर्षा उसगांवकर एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे. पण नेमकं कोण घराबाहेर झालं आहे? हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 suraj chavan shared with nikki tamboli and abhijeet sawant about his wedding plan pps