Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सर्वात चर्चेत असणारा स्पर्धक म्हणजे सुरज चव्हाण. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींसह अनेकांचा पाठिंबा सुरज चव्हाणला मिळताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरज व्हावा असं अनेकांचं म्हणणं आहे. सुरजचा खेळ सगळ्यांना आवडत आहे. अशातच ९ ऑगस्टच्या भागात सुरजने घरच्यांच्या आठवणीत जोडीदार कसा हवा? यासंबंधित भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ ऑगस्टच्या भागात सुरज निक्की तांबोळी, घनःश्याम दरवडे आणि जान्हवी किल्लेकरबरोबर गप्पा मारत दिसला. यावेळी त्याने घरच्यांच्या आठवणी सांगितल्या. आई, बाबांना आपण काय हाक मारायचो? आई बालपणी कशी सांभाळ करायची? हे सगळं सुरजने निक्की, घनःश्याम आणि जान्हवीला सांगितलं. यावेळी तो अनाथ मुलगीच बायको करणार, असं म्हणाला. सुरज नेमकं काय म्हणाला? वाचा….

हेही वाचा – Video: ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा जबरदस्त नवा प्रोमो

सुरज म्हणाला, “आजी, आजोबा, पप्पा, मम्मी वरून बघतं असतील. मी पप्पांना आप्पा म्हणायचो. मी एकदम साध्या पद्धतीत आई, आप्पा अशी हाक मारायचो. आई शब्दात इतकी ताकद आहे, जी कोणामध्येही नाही. तिला इतकी माया आहे ना. मांडीवर घेऊन झोपवणं. लुली करत गाणी म्हणणं. डोक्यावर थापटणं. ते दिवस मला खूप आठवतात. उगाच मोठं झालो असं वाटतं. जन्म देऊन आपल्याला सोडून जातात हे मला खूप वाईट वाटतं. लगेच सोडून जायचं असेल तर जन्मचं द्यायचा नाही. कोणाचं पण मी सांगतो. आता बिचारे अनाथ असतात ते. मी तर अनाथ मुलगीच बायको करणार. मी पण अनाथ ती पण अनाथ. आता नशीबात अनाथ असलेली भेटली तर लय बरं होईल.” त्यानंतर निक्की सुरजला समजवतं म्हणते, “तुझं नशीब तू लिही. नशीब असं म्हणू नकोस. तुला जे हवं ते तुझं नशीब आहे. त्यामुळे तुच लिहायचं तुझं नशीब.”

हेही वाचा – Video: “जा बुड, मर त्या पाण्यात…”, अमृता खानविलकर चिडली संकर्षण कऱ्हाडेवर, नेमकं काय घडलं? पाहा

दुसऱ्या आठवड्यात कोणते स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) दुसऱ्या आठवड्यात योगिता, पंढरीनाथ, निक्की, घन:श्याम, सूरज आणि निखिल असे सहा स्पर्धक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता पुरुषोत्तमदादा पाटीलनंतर कुठला स्पर्धक घराबाहेर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 suraj chavan talk about her future wife pps