Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या अंतिम आठवडा सुरू आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेले दोन आठवडे गैरहजर असलेला रितेश देशमुखचं ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होस्ट करणार आहे. गुरुवारी ( ३ ऑक्टोबरला )च्या भागात टॉप-७ सदस्यांसाठी खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत डीजे क्रेटेक्सनी प्रत्येक सदस्यासाठी खास गाणी तयार केली होती. याच वेळी मिडवीक एलिमिनेशन पार पडलं.

मिडवीक एलिमिनेशनच्या प्रक्रियेत सर्वात आधी अभिजीत सावंत सेफ झाल्या. त्यानंतर धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर हे दोन सदस्य सेफ झोनमध्ये आले. यामुळे अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर डेंजर झोनमध्ये होते. यामधील वर्षा उसगांवकर या घराबाहेर झाल्या. आता निक्की, अभिजीत, धनंजय, जान्हवी, अंकिता आणि सूरज या सहा सदस्यांमधील कोण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच या शेवटच्या दिवसांत ‘बिग बॉस घरात’ सध्या चित्रपट आणि मालिकेतील कलाकार दंगा घालण्यासाठी जात आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील नवी मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’मधील नायिका बिग बॉसच्या घरात गेल्या आहेत. या नायिकांनी सदस्यांबरोबर काही मजेशीर खेळ खेळले. याचे प्रोमो सध्या समोर आले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 : एक ९०च्या दशकातील सेन्सेशनल क्वीन, तर दुसऱ्याला निर्मात्याने सेटवरून दाखवलेला बाहेरचा रस्ता; वाचा स्पर्धकांची नावं

‘टीआरपी मराठी’ या इन्टाग्राम पेजवर निक्की आणि अभिजीतमधल्या खेळाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये “हे सोप आहे का?” विचारत निक्की पदार्थाचा फोटो डोक्यावर ठेवताना दिसत आहे. त्यानंतर अभिजीत तिला समजवू लागतो. तो म्हणतो, “हे तांदळाचं बनतं आणि चपातीसारखं असतं.” तेव्हा निक्की म्हणते, “डोसा?” तर अभिजीत म्हणतो की, नाही. ते कोकणात बनतं. माशांबरोबर खातात. त्यावेळेस निक्की म्हणते, “हां…ते…ते…भाकरी सारखं असतं ते.”

त्यानंतर जान्हवी अभिजीतला सांगते निक्कीला कशाप्रकारे हिंट दे. मग अभिजीत म्हणतो, “अरे राखी तुला बोलली होती.” तेव्हा निक्की अचूक ओळखते आणि म्हणते, “आंबोळी…तू एवढा वेळ घेतलास समजवायला…अरे तू असा कसा आहेस.” अभिजीत म्हणतो की, मुळात मी तो शब्द आठवत होतो. यावर अंकिता म्हणते, “तो विसरला होता.” त्यानंतर सूरज टोमणा मारत म्हणतो, “तो आता गजनी झाला आहे.”

हेही वाचा – Video: नव्या मालिकेतील नायिकांचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दंगा, पुन्हा एकदा सूरजला सुतरफेणी ओळखताना आले नाकीनऊ, पाहा प्रोमो

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ची नवी मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या मालिकेची सुरू होणाऱ्याची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झालेलं नाही. पण ‘पिंगा गं पोरी पिंगा’च्या जबरदस्त प्रोमोने प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे.

Story img Loader