Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता नववा आठवडा सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांना अनेक धक्के दिले. शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्या’वर पत्रकारांच्या सणसणीत प्रश्नांची उत्तर देताना सर्व सदस्य पाहायला मिळाले. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर झाला. यामुळे सर्व सदस्यांना धक्काच बसला.

त्यानंतर रविवार झालेल्या ‘भाऊच्या धक्या’वर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत धमाल-मस्ती झाली. त्यानंतर नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. आठव्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या सदस्याचं नाव ऐकून निक्की तांबोळीचा टाहो फुटला. कारण घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव अरबाज पटेल होतं. अरबाज घराबाहेर गेल्यामुळे आता निक्की हतबल झाली आहे. सतत रडताना दिसत आहे. अशातच सूरज निक्कीला आधार देताना पाहायला मिळाला. नुकताच ‘कलर्स मराठी’ने सोशल मीडियावर याचा प्रोमो शेअर केला आहे.

Chennai Food delivery Boy
Chennai : धक्कादायक! पार्सल देण्यास उशीर झाल्याने महिलेची शिवीगाळ, मन दुखावल्याने फूड डिलीव्हरी बॉयची आत्महत्या
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Anant chaturdashi 2024 Little children got emotional
‘बाप्पा निघाले गावाला…’ बाप्पाचा निरोप घेताना चिमुकल्या झाल्या भावूक; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “खऱ्या भावना..”
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
Crime against three who tie down man in house even after repaying the loan
कर्जाची परतफेड केल्यानंतरही घरात डांबणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा
Hindenburg on Madhabi Puri Buch
Hindenburg on Madhabi Puri Buch: “माधबी पुरी बूच गप्प का?”, ‘हिंडेनबर्ग’ने सेबीच्या अध्यक्षांवर नवा आरोप करत उपस्थित केला सवाल
Agricultural Commodity Markets Rice Exports Ethanol Producers
तांदूळ, साखर, मका; पुढे इथेनॉलचा धोका
jaipur kid not leaving kidnapper viral video
Video: चिमुकल्याला लागला अपहरणकर्त्याचा लळा, आई-वडिलांकडेही जाईना; पोलिसांनी सोडवताच रडू लागला!

हेही वाचा – “त्याचा पतंगाची दोरी…”, अरबाज पटेलच्या एलिमिनेशनवर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाला…

या प्रोमोमध्ये सूरज निक्कीला समजवताना दिसत आहे. सूरज म्हणाला, “तुला कोणी नाही, पण मी आहे ना.” यावर निक्की म्हणते की, आहे ना, तू आहे. त्यानंतर सूरज म्हणाला, “मग आपण एकत्र बसायचं.” त्यावर निक्की म्हणाली की, तुझ्याबरोबर मी बसतेच आणि बसणार आहे. पुढे सूरज म्हणाला, “हे आपलं कुटुंब आहे, हे आपलं घर आहे.” निक्की व्यक्त होत म्हणाली, “मी कधी इतकं कोणासमोर हात जोडून भीक नाही मागितली आहे की, घरात थांब.” हे ऐकून सूरज खंबीरपणे म्हणाला की, आता रडायचं नाही. आपल्या स्ट्राँग व्हायचं आहे ना. त्यावर निक्की म्हणाली, “मी स्ट्राँग आहे. पण दुःख राहिल ना यार .” सूरज म्हणाला, “दुःख राहतच.”

पुढे निक्की म्हणाली, “तेच सांगते दुःखातून कसं जायचं पुढे?” यावर सूरज म्हणाला, “तुला मी सांगतो, आज्या आपल्या भावना असतात त्या आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात. पण जवळचा माणूस आपल्याला सोडून गेल्यावर.” तेव्हा निक्की म्हणाली, “याच्या पुढचा प्रवास कठीण आहे.” त्यावर सूरज म्हणाला की, आपण एकटा आलोय तर एकटा आपल्या घरी जाणार. आता फॉक्स गेमवर करायचा…खोटं बोलत नाही…मी लढणार…मला भावना आहेत…पण कसं आहे, इथे एकट्यानेच खेळायचं आहे.” निक्की म्हणाली, “ते तरच आहेच.” सूरजने निक्कीला विचारलं, “खेळायचं ना?” निक्की म्हणाली, “हो.” यावर सूरज म्हणाला की, मग त्रास स्वतःला करून नाही घ्यायचा. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी सूरजच्या साध्या-भोळ्या स्वभावचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Video: वर्षा उसगांवकरांना कोथिंबीर वडी ओळखू येईना अन् मग…; पाहा नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकर घेणार प्रेक्षकांचा निरोप

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ची जोरदार चर्चा सुरू असली तरी दुसऱ्याबाजूला हे पर्व ७० दिवसांत गुंडाळणार असल्याचं समोर आलं आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेक कलाकारांसह प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.