Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सतत वाद होतं असतात. मंगळवारच्या भागामध्ये ‘सत्याचा पंचनामा’ टास्क खेळताना निक्की-अरबाज, निक्की-वैभव, घनश्याम तसंच अभिजीत-अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. वर्षा उसगांवकरांनंतर तिने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला. यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात झळकलेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची भडकल्या. “तिच कर्तुत्व काय आहे? माज उतरावा”, असं लिहित त्यांनी जान्हवीवर टीका केली आहे. टास्क दरम्यान नेमकं काय घडलं? सुरेखा कुडची ( Surekha Kudchi ) नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये पंचनामा खोलीत वर्षा उसगांवकर यांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी बिग बॉसकडून ( Bigg Boss Marathi ) वर्षा यांच्याविषयी विधान करण्यात आलं की, घरातील सदस्यांच्या मते आपण निक्कीबरोबर वाद घालणं सोडून दिल्यापासून आपला खेळ संपला आहे. खरं की खोटं? बिग बॉसच्या या विधानावर वर्षा यांनी सहमती दर्शवली. विरोधी गटातील निक्कीने वर्षा यांच्या मतावर सहमती दर्शवली आणि ती हिरवा बजर दाबण्यासाठी तयारही झाली होती. पण तितक्यात टीममधल्या सदस्यांनी विरोध केला. तेव्हा बी टीममध्ये वाद झाले. पण अखेर बी टीमने वर्षा यांच्या मताशी असहमत असल्याचं जाहीर करून लाल बजर दाबला. त्यामुळे पंचनामा खोलीतून वर्षा रिकाम्या हातीचं परतल्या. त्यानंतर वैभव निक्कीमध्ये वाद झाले. याच वेळी जान्हवीने पुन्हा एकदा पातळी ओलांडली.
“आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले”
जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवतायत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.” जान्हवीच्या याच वागण्यावरून सुरेखा कुडची भडकल्या. “माज उतरावा त्यांचा…खूप झालं आता…”, असं कॅप्शन सुरेखा यांनी त्यांच्या पोस्टला दिलं आहे.
अभिनेत्री सुरेखा कुडची पोस्टमध्ये लिहिलं आहे, “माज माज आणि माज…ती कोण आहे? जी बी टीमला भीक आणून देईन म्हणते…ती कोण आहे? जी त्या डीपीला गेट उघडू का विचारते?…ती कोण आहे? जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन…ती कोण आहे? जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून आता इथे ओव्हर अॅक्टिंग करायला आलाय म्हणतेय…आहे कोण ती?…काय कर्तुत्व आहे तिच?…कसला माज आहे हा?…हिला बिग बॉसचा आशीर्वाद आहे का?…रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करतेय…ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमत नाही होणार परत कुणाला असं बोलायची…शब्द ऐकूनच च*** ओली झाली असती…वारे वाह अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय, त्यांना काहीच बोललं जात नाहीये…या शनिवारी पाहायचं आहे या वर काही बोललं जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जातंय…”
दरम्यान, सुरेखा कुडची यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खरंय ताई, हिचा माज उतरलाच पाहिजे. सर्व सिने कलाकारांची यांनी त्वरित माफी मागितली पाहिजे”, “अगदी सत्य आहे ताई, तुमच्या मताशी मी सहमत आहे”, “मांजरेकर सर पाहिजे होते”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.