Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये जोरदार भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. या भांडणांदरम्यान निक्की तांबोळीने “मराठी लोकांची मानसिकता अशी असल्याने मी या शोमध्ये येत नव्हते” असं विधान केलं होतं. या वाक्यावरून रितेश देशमुखने निक्कीला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागण्यास सांगितलं. याशिवाय वर्षा उसगांवकरांनी सुद्धा निक्की अत्यंत वाईट भाषा वापरते असे आरोप केले आहेत. यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. काही मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत यासंदर्भात निक्कीला खडेबोल सुनावले आहेत.
निक्की व घरात वर्षा उसगांवकरांना चुकीची वागणूक देणाऱ्या काही स्पर्धकांविरुद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्या ‘बिग बॉस’मध्ये यापूर्वीच्या पर्वात देखील सहभागी झाल्या होत्या. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत वर्षा उसगांवकरांना पाठिंबा दर्शवला आहे. सुरेखा यांची पोस्ट पाहूयात…
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “जान्हवी तुला लाज वाटत नाही का?”, वर्षा उसगांवकरांना ‘ती’ वागणूक दिल्यामुळे प्रेक्षक संतापले! म्हणाले, “साइड रोल करणारी…”
सुरेखा यांची पोस्ट ( Bigg Boss Marathi )
बिग बॉस मराठी सीझन ५ …
खूप आतुरतेने वाट पहाट होते… वर्षा ताई आणि पॅडीला पाहून मनापासून आनंद झाला…
पण, काही स्पर्धक मराठी असून मराठी लोकांच्या मानसिकतेवर बोलतात… तेव्हा वाईट वाटतं… मी स्वतः साऊथची आहे माझी भाषा कन्नड आहे पण, मला ओळख दिली या महाराष्ट्राने… आपल्या महाराष्ट्रात कलाकारांवर प्रेम करणारे त्यांचा आदर करणारे प्रेक्षक आहेत… असं असताना आज ‘बिग बॉस’च्या घरात काही जण आपल्या वयापेक्षा पेक्षा दुप्पट असलेल्या, एक काळ मराठी चित्रपट इंडस्ट्री गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा ताईंचा जेव्हा अपमान करतात तेव्हा वाईट वाटतं…
मान्य आहे त्या घरात सगळे सारखे आहेत सगळे स्पर्धक आहेत पण, तरीही बोलताना वयाचं भान राखणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ३ महिन्यांचा खेळ संपला की, शेवटी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हेच पाहिलं जातं…
आणखी एक नवल म्हणजे आता कुठे एक मलिका संपवून आलेले कलाकार जेव्हा आपल्या सिनियरला पाण्यात पाहतात… त्यांच्यावर हसतात तेव्हा हे सगळं पाहून लाज वाटते
असो वर्षा ताई उभा महाराष्ट्र तुमचा बाजूने उभा आहे!
हेही वाचा : Video : “आठ दिवस बोलली नाहीस बोल आता…”, छोट्या पुढारीचा योगिता चव्हाणवर जबरदस्त पलटवार, पाहा प्रोमो
दरम्यान, सुरेखा यांच्याप्रमाणे यापूर्वी जय दुधाणे, पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे या कलाकारांनी देखील वर्षा उसगांवकरांना पाठिंबा दिला होता. याशिवाय भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा निक्की तांबोळीची चांगलीच शाळा घेतली आहे. त्यामुळे आता येत्या आठवड्यात ( Bigg Boss Marathi ) निक्की घरात कशी वागणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.