Bigg Boss Marathi Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये नेमकं कोण नॉमिनेट झालं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या सीझनचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात सगळ्यात आधी घरात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘ए’ ग्रुप व ‘बी’ ग्रुप अशा दोन टीम केल्या गेल्या होत्या. दोन्ही टिमने विरुद्ध संघातील सदस्यांना बीबी करन्सी जिंकू दिली नाही. दोन्ही संघांना एकही रुपया जिंकता न आल्याने ‘बिग बॉस’ने याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आधीच स्पष्ट केलं होतं.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

‘बिग बॉस’ने दिलेल्या सूचक इशाऱ्यानुसार अरबाजला डिलेमा रुममध्ये बोलावण्यात आलं. एकतर कॅप्टनपद किंवा बीबी करन्सी यामधला एक पर्याय त्याला निवडायचा होता. अखेर अरबाजने कॅप्टन्सीवर पाणी सोडत घरातल्या सदस्यांचा विचार करून बीबी करन्सीची निवड केली. तर, त्याच्या जागी घराचा कॅप्टन निक्कीला बनवलं.

हेही वाचा : Video: निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरशी आर्याने घेतला पंगा; नेटकरी म्हणाले, “तू फक्त नड….”

Bigg Boss Marathi – हे चार सदस्य झाले नॉमिनेट

आता निक्की कॅप्टन झाल्याने ती या आठवड्यात सेफ होती. त्यामुळे उर्वरित सदस्यांमध्ये नॉमिनेशन टास्क खेळवण्यात आला. प्रत्येकाच्या गळ्यात एकमेकांचे फोटो आहेत. उदाहरणार्थ, अंकिताच्या गळ्यात सूरज, सूरजच्या गळ्यात वर्षा उसगांवकर, जान्हवीच्या गळ्यात आर्या, आर्याच्या गळ्यात इरिनाचा फोटो होता. ज्यांना फोटोतील सदस्यांना नॉमिनेट करायचं असेल त्यांनी पळत जाऊन बझर वाजवायचा. जो आधी बझर वाजवेल त्या सदस्याला नॉमिनेट करण्यासाठी संबंधित सदस्याचा फोटो चुलीत जाळण्याची संधी मिळेल.

सगळ्यात आधी जान्हवीने बझर वाजवून आर्याला नॉमिनेट केलं. त्यानंतर आर्याने इरिनाला नॉमिनेट केलं. या टास्कमध्ये अभिजीतच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे अभिजीतने अरबाजला सांगितलं, “घनश्याम:ने मला नॉमिनेट करूदेत पण, या बदल्यात तुम्ही मला वैभवला नॉमिनेट करायला द्यायचं.” ही डील ग्रुप ‘ए’ला मंजूर नव्हती तरीही शेवटी अभिजीत काही झालं तरी आपल्या मतावर ठाम होता. परिणामी, वैभव शब्द देऊन मोकळा झाला आणि त्याची डील फसली. शेवटच्या राऊंडमध्ये अभिजीतने वैभवला नॉमिनेट केलं.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : Quiz : कोणी काढला टॅटू, तर कोणी कापले केस? ‘बिग बॉस मराठी’चे कट्टर चाहते देऊ शकतात ‘या’ १० प्रश्नांची उत्तरं

दरम्यान, आता या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी आर्या जाधव, इरिना, अभिजीत सावंत आणि वैभव चव्हाण हे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी घराचा ( Bigg Boss Marathi ) निरोप कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader