Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला होता. परंतु, दुसऱ्या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. रितेश देशमुखने याबद्दल भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांना माहिती दिली. ‘कलर्स मराठी’ वाहिनी आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आल्याने या आठवड्यात एलिमिनेशन नसेल परंतु, हेच स्पर्धक पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट असतील असं रितेशने सांगितलं. याशिवाय उद्या घरात दोन नवीन पाहुणे येणार असल्याचं देखील अभिनेत्याने सर्व सदस्यांना सांगितलं होतं.

‘बिग बॉस’च्या घरात येणारे नवीन पाहुणे नेमके कोण असणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकांनी शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री होईल असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता. प्रेक्षकांप्रमाणे घरातील सदस्यांना सुद्धा नेमकं कोण येणार याची उत्सुकता होती. नवे पाहुणे घरात येण्याआधी घरातले सगळे स्पर्धक ‘पिया तू अब तो आजा…’ या जुन्या गाण्यावर थिरकताना दिसले.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…

हेही वाचा : Video : “मी काहीतरी आणलंय…”, हिंदी शोमध्ये श्रद्धा कपूरचा मराठीत संवाद, स्पर्धकाला दिली खास भेटवस्तू! सर्वत्र होतंय कौतुक

Bigg Boss Marathi : घरात आले दोन नवीन पाहुणे

वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी, अरबाज या सगळ्यांनी मिळून ‘पिया तू अब तो आजा…’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. एवढंच नाहीतर निक्कीने डान्स केल्यावर, “प्लीज ‘बिग बॉस’ कोण येतंय त्यांना पाठवा” अशी विनंती देखील केली. यानंतर घरात या दोन पाहुण्यांची एन्ट्री झाली.

घरात येणाऱ्या दोन पाहुण्यांच्या स्वागतासाठी घरातले सगळे सदस्य मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे होते. कोण आलं असेल याचा विचार करून सगळेजण उत्सुकतेने दरवाजाकडे पाहात होते. एवढ्यात दरवाजा उघडला अन् घरात दोन बाहुल्यांरुपी लहान बाळांची एन्ट्री झाली. आता या दोन बाहुल्यांची स्पर्धकांना सेवा करायची आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये निक्की यापैकी एका बाहुल्याकडे बघून अन् घन:श्यामला उद्देशून “हा मामा आहे ना” असं म्हणते. यावर घन:श्याम सुद्धा “हो मामा आहे” असं म्हणतो.

bigg boss marathi
Bigg Boss Marathi : सदस्यांचा जबरदस्त डान्स ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : एलिमिनेशनपासून सुटका! सगळे झाले ‘सेफ’ पण, रितेश देशमुखने सांगितला मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस’ निक्कीला “तुम्ही थेट बाई…वरून आई… झालात” असं म्हणत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता घरातला हा नवीन टास्क नेमका काय असणार आहे आणि यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याशिवाय या तिसऱ्या आठवड्यात घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी निक्की, योगिता, सूरज, निखिल, पंढरीनाथ आणि घन:श्याम हे सदस्य नॉमिनेट आहेत. यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला कळणार आहे.

Story img Loader