Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वात आता नऊ सदस्य बाकी राहिले आहेत. सातव्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर झाले. एक म्हणजे आर्या जाधव आणि दुसरा वैभव चव्हाण. कॅप्टन्सी टाक्समध्ये निक्कीला कानशिलात लगावल्यामुळे ‘बिग बॉस’ने आर्याला कठोर शिक्षा सुनावत थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. यावेळी अरबाज आणि जान्हवी ढसाढसा रडताना पाहायला मिळाले. अरबाजने रितेश देशमुखकडे वैभवला एक संधी देण्याची विनंती केली. पण तसं काही झालं नाही. ‘बिग बॉस’च्या घरात नेमकं काय चुकलं? याविषयी वैभवने आपलं परखड मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर येताच वैभवने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधला. यावेळी वैभवला विचारलं की, तुझं काय चुकलं, असं तुला वाटतं? तेव्हा वैभव म्हणाला, “मला वाटतंय माझा ग्रुप चुकला. नक्कीच मी हे म्हणून शकतो. कारण मी ज्यांना जास्त रिलेट करत होतो अशा ग्रुपमध्ये न जाता, ज्यांना मी जास्त रिलेट करू शकत नाही अशा ग्रुपमध्ये राहिलो. कारण मला नव्हतं माहित पुढे जाऊन कशा गोष्टी फिरतील आणि पलटतील. पण थोड्या फार गप्पा गोष्टी ‘ए’ ग्रपबरोबर होतं होत्या. त्यात पण अरबाज, जान्हवीबरोबर जास्त होतं होत्या. त्यानंतर इरिना त्या ग्रुपमध्ये आली. इरिना आल्यानंतर त्या ग्रुपमध्ये जास्त दिवस राहिलो.”

हेही वाचा – “…त्याच्यामुळे मी बाहेर आहे”, एलिमिनेट झाल्यानंतर वैभव चव्हाणचं वक्तव्य, म्हणाला…

वैभव चव्हाण निक्कीबद्दल काय म्हणाला?

पुढे वैभव स्पष्टच म्हणाला, “पहिल्या दिवसापासून निक्कीबरोबर माझं जास्त जमतं नव्हतं. कारण तिच बोलणं, वागणं पटतं नव्हतं. त्यात मी थेट म्हणून शकत नाही की तू अशीच आहेस आणि तू तशीच आहेस. पण मी तिच्याबरोबर चर्चा कमी व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो.”

“अरबाजला मी हे सांगत होता की, तिच्यामुळे तू तुझा गेम खराब करतोय आणि माझाही गेम खराब करतोय. तर हे कळतं होतं की, ग्रुप चुकला आहे. जर त्या ग्रुपमध्ये असतो तर ती माणसं मला जास्त रिलेट झाली असती. मी नंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांनी मनात माझ्याबाबतीत ठरवून ठेवलं होतं की, हा मुलगा नाही राहू शकत. त्यामुळे मी तळ्यात मळ्यात राहिलो आणि सगळं फसलं. पण आता ठीक आहे,” असं वैभव चव्हाण म्हणाला.

हेही वाचा – Video: ऐश्वर्या राय बच्चनला मिळाला पुरस्कार, लेक होती सोबतीला; कधी किस करताना तर कधी फोटो काढताना दिसली आराध्या

दरम्यान, रविवारी ( १५ सप्टेंबर ) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने घरातील सदस्यांना एक मोठं सरप्राइज दिलं. ते म्हणजे रितेश देशमुख स्वतः ‘बिग बॉस’च्या घरात गेला आणि त्याने सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांचे व्हिडीओ दाखवले. हे व्हिडीओ पाहून सर्व सदस्य भावुक झाले. त्यानंतर शेवटी एलिमिनेट होणाऱ्या सदस्याचं नाव जाहीर केलं. निक्की, अंकिता आणि वैभव हे नॉमिनेशनमध्ये होते. या तिघांमध्ये निक्की व अंकिता सेफ झाली आणि वैभव एलिमिनेट झाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 vaibhav chavan said i choose wrong group pps