Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या आठवड्यात वैभव चव्हाण घराबाहेर झाला. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधत आहे. अलीकडेच वैभवने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने एकंदरीत त्याच्या खेळाविषयी सांगितलं. तसंच आपलं काय चुकलं? कोण कसं आहे? याबद्दलही बोलला. शिवाय आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय घडलं? याविषयी त्याने सांगितलं.

दरम्यान, सातव्या आठवड्यातील जादूई हिरा या कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये वाद झाले. या वादाचे रुपांतरी काही वेगळात धक्काबुकी झाले. शेवटी रागाच्या भरात आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. यामुळे तिला लगेच जेलमध्ये टाकलं आणि ‘भाऊच्या धक्क्या’वर कठोर शिक्षा सुनावणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्या’वर ‘बिग बॉस’ने आर्याला थेट घराबाहेर केलं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी वैभव घराबाहेर गेला. घराबाहेर आल्यानंतर वैभव आर्या आणि त्या घटनेविषयी बोलला.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Anjali Damania Statement
Anjali Damania : अजित पवारांचं नाव घेत अंजली दमानियांची टीका, “माझ्या तळपायाची आग मस्तकात..”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

हेही वाचा – “बिग बॉसच्या घरात निक्कीच्या बडबडीचा खूप त्रास होतो”, एलिमिनेट झालेल्या वैभव चव्हाणचं विधान, म्हणाला, “तिचा मूळ स्वभाव…”

तो म्हणाला, “मी तिथे होतो. पण मला अर्धी बाजू दिसली. कारण तो दरवाजा अर्धा बंद होता. त्यामुळे आतमध्ये काय घडलं हे माहित नव्हतं. फक्त एवढं दिसलं की आर्याने मारलं आणि ज्या काही गोष्टी घडल्या त्या रागाच्या ओघात घडल्या. मला असं वाटतंय मोठ्या नियमाचं उल्लंघन झालं. राग योग्य होता, एकमेकांना टिगर करणं योग्य होतं, एकमेकांबद्दल बोलणं ठीक आहे, टास्कमध्ये धक्काबुकी ठीक आहे. पण आतमध्ये लोकांना कधी कधी हे कळतं नाही की, टास्कमधील धक्काबुकी आणि जाणूनबुजून मारणं यात फरक आहे. हे मला समजत होतं.”

पुढे वैभव चव्हाण म्हणाला, “आर्याने सगळे आरोप स्वीकारले. पण तिला ते कळतं नव्हतं जाणूनबुजून एकावरती हात उचलणं ही हिंसा आहे. बाकी राग तिचा योग्य होता. गोष्टी घडल्या ते योग्यचं चालू होतं. असं काही नव्हतं. तिने जर मारलं नसतं तर कारण आर्या स्ट्राँग सदस्य आहे. मला वाटतं, ती टॉप-५ सदस्यांपैकी एक होती. माझे आणि तिचे भरपूर वादावाद झाले. पण मी कधी तिला म्हटलं नाही, तू वीक आहेस. कारण मीच तिला एकदा नॉमिनेशनमधून सेफ केलंय. स्ट्राँग होती. बिग बॉसला तो निर्णय घ्यावा लागला कारण सगळ्यात मोठा नियमाचं उल्लंघन झालं. तिच्या जागी दुसरं कोणी असतं तर तेच करावं लागलं असतं.”

हेही वाचा – “तुझ्यासारखं व्यक्त होता येत नसलं तरी…”, प्रिया बापटच्या वाढदिवशी पती उमेशची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला…

‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader