Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा दणक्यात पार पडला. पण या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून दोन सदस्य बाहेर गेले. ‘जादूई हिरा’ उचलण्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळीला कानशिलात लगावली. त्यामुळे शनिवारी ( १४ सप्टेंबर ) ‘बिग बॉस’ने आर्याला कठोर शिक्षा सुनावली. तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला. असं झालं तरी रविवारी ( १५ सप्टेंबर ) आणखी एक सदस्य एलिमिनेट झाला तो म्हणजे वैभव चव्हाण. सरप्राइज देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात गेलेला रितेश देशमुख वैभवला घराबाहेर घेऊन आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे मॅच्युअल फंड कॉइनचा वारसदार वैभवने जाहीर केला. त्याने अरबाज आणि जान्हवीला आपल्या मॅच्युअल फँडचे कॉइन दिले आणि तो घराबाहेर पडला. ‘बिग बॉस’च्या घरातील दीड महिन्यांचा प्रवास वैभवसाठी कसा होता? जाणून घ्या.

‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर येताच वैभव चव्हाणने ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं की, तुझ्या नजरेतून तुझा दीड महिन्यांचा प्रवास कसा होता? अपेक्षेप्रमाणे होता का? यावर वैभव म्हणाला, “नाही. माझ्या अपेक्षा या माझ्याकडून खूप जास्त होत्या. अर्थात लोकांनी पण ठेवल्या असतील. पण कुठंतरी खेळ खूप कमी पडला. असं नाही म्हणून शकतं की, थोडं कुठंतरी कमी पडलो. खूप कमी खेळ पडला. कारण मला माहितीये मी कसा आहे. मला माहितीये मी काय करू शकतो. पण इथे अशी परिस्थिती आली की, मला स्वतःसाठी लगेचच निर्णय घेता आले नाहीत. खूप जास्त वाटतं होतं की इथे हे करायला पाहिजे होतं. पण ते झाल्यानंतर त्या गोष्टी उपयोगाच्या नसतात.”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Bigg Boss 18 Farah Khan warns to rajat dalal on weekend ka vaar
Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”

हेही वाचा – Video: ऐश्वर्या राय बच्चनला मिळाला पुरस्कार, लेक होती सोबतीला; कधी किस करताना तर कधी फोटो काढताना दिसली आराध्या

पुढे वैभव चव्हाण म्हणाला की, तसंच आयुष्यात या गोष्टी गरजेच्याच असतात की ज्यावेळेस आपल्याला कळतं की इथे ही गोष्ट करायला पाहिजेत. जर ते नाही घडलं. तर त्या गोष्टी नंतर कळतात. पण स्वतःचा गेम कमी पडला हे मी नक्कीच म्हणेण. ‘बिग बॉस’मध्ये पण ज्या गोष्टी घडल्या पाहिजे होत्या, ज्या गोष्टी मी पलटवू शकलो असतो त्या झाल्या नाहीत. त्याच्यामुळे मी बाहेर आहे. जर मी या गोष्टी केल्या असत्या तर मी बाहेर नसतो आज आतमध्ये असतो आणि पूर्णपणे खेळलो असतो. पण नक्कीच माझ्या खूप गोष्टी चुकल्या, हे स्वीकारणं गरजेचं आहे.

हेही वाचा – Video: धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरमध्ये बिनसलं, डीपी नाराजी व्यक्त करत म्हणाला, “आता बास झालं…”

दरम्यान, रविवारी ( १५ सप्टेंबर ) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने घरातील सदस्यांना एक मोठं सरप्राइज दिलं. ते म्हणजे रितेश देशमुख स्वतः ‘बिग बॉस’च्या घरात गेला आणि त्याने सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांचे व्हिडीओ दाखवले. हे व्हिडीओ पाहून सर्व सदस्य भावुक झाले. त्यानंतर शेवटी एलिमिनेट होणाऱ्या सदस्याचं नाव जाहीर केलं. निक्की, अंकिता आणि वैभव हे नॉमिनेशनमध्ये होते. या तिघांमध्ये निक्की व अंकिता सेफ झाली आणि वैभव चव्हाण एलिमिनेट झाला.

Story img Loader