Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा दणक्यात पार पडला. पण या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून दोन सदस्य बाहेर गेले. ‘जादूई हिरा’ उचलण्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या जाधवने निक्की तांबोळीला कानशिलात लगावली. त्यामुळे शनिवारी ( १४ सप्टेंबर ) ‘बिग बॉस’ने आर्याला कठोर शिक्षा सुनावली. तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला. असं झालं तरी रविवारी ( १५ सप्टेंबर ) आणखी एक सदस्य एलिमिनेट झाला तो म्हणजे वैभव चव्हाण. सरप्राइज देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात गेलेला रितेश देशमुख वैभवला घराबाहेर घेऊन आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे मॅच्युअल फंड कॉइनचा वारसदार वैभवने जाहीर केला. त्याने अरबाज आणि जान्हवीला आपल्या मॅच्युअल फँडचे कॉइन दिले आणि तो घराबाहेर पडला. ‘बिग बॉस’च्या घरातील दीड महिन्यांचा प्रवास वैभवसाठी कसा होता? जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा