Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला रविवारी (२८ जुलै रोजी) सुरुवात झाली. या शोमध्ये पहिल्याच दिवसापासूनच सदस्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss Marathi Season 5 updates) नवनवीन टास्क व नियमांमुळे स्पर्धकांची तारांबळ उडताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’ने सदस्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. सदस्यांचं पाणी बंद केल्यानंतर व त्यांना उपाशी ठेवल्यानंतर आता ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे (Varsha Usgaonkar) जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळेल.

कॅन्सरने वडिलांचं निधन, आईला रक्ताच्या उलट्या अन्…; सूरज चव्हाणची संघर्षमय कहाणी! आता दिवसाला कमावतो तब्बल…

Varsha Usgaonkar And Nikki Tamboli fight promo: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही ‘बिग बॉस’ने शिक्षा दिलेली आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही”. ‘बिग बॉस’च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्यांची चिंता वाढते.

दुसरीकडे वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस’ला म्हणाल्या,”चुकून झालं”. त्यावर पारा चढलेली निक्की म्हणते,”आम्हाला भोगावं लागतंय..तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय”. यावर वर्षा म्हणतात,”माझ्या एकटीमुळे नाही”. त्यावर निक्की म्हणते,”तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती, जेव्हा तुम्ही झोपला होतात.”. निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात,”आरडाओरडा करू नको”. तरीही निक्की शांत बसत नाही आणि प्रत्युत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते.

पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी! वर्षा उसगांवकरांच्या मेकअपमुळे निक्कीसह घरातील सदस्य संतापले, पाहा व्हिडीओ

बिग बॉसच्या घरातील भांडणादरम्यानचा एक क्षण (फोटो -पीआर)

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईंमध्ये पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही या दोघींमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळत आहे. निक्कीचं बोलणं व वर्षा उसगांवकर यांचा चढलेला पारा येत्या भागात ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 ठरलं तर मग : मायलेकींचं प्रेम! प्रतिमासाठी सायली गाणार अंगाई; पूर्णा आजीचे डोळे पाणावले, मालिकेत पुढे काय घडणार?

बिग बॉसच्या घरातील १६ स्पर्धक

‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 5 Contestants List) पाचव्या पर्वात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनी व जिओ सिनेमावर प्रसारित होतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 varsha usgaonkar and nikki tamboli ugly fight promo viral hrc