Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील फायनलिस्ट होण्याची ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकरांची संधी थोडक्यासाठी हुकली. अंतिम आठवड्यापर्यंत त्या पोहोचल्या. पण सहाव्या स्थानावरून वर्षा उसगांवकर घराबाहेर झाल्या. ‘बिग बॉस मराठी’च्या या संपूर्ण प्रवासात वर्षा उसगांवकर यांचं धनंजय पोवारशी कधी पटलं नाही. सतत दोघांमध्ये तू तू में में व्हायची. त्यामुळे वर्षा उसगांवकरांना सतत डीपीचं वागणं खटकायचं. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर वर्षा उसगांवकरांनी डीपीच्या वागण्याविषयी सांगितलं.

‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “डीपी अतिशय पोरकटपणे वागत होता. मला त्याचं वागणं कधी रुचलं नाही. ते मी त्याला स्पष्ट बोलून दाखवलं. तसंच दोन-तीन वेळा त्याने मला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. एकतर त्याने जान्हवीबद्दल माझ्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न केला. तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जे तिने केलंच नाही ते तिने केलं असं त्याने मला सांगितलं.”

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”

हेही वाचा- Bigg Boss 18 : ग्रँड प्रिमियरच्या काही तासांआधी लोकप्रिय अभिनेत्रीने सलमान खानच्या शोला दिला नकार, पोस्ट करत म्हणाली, “मला दोष…”

“त्याने मला सांगितलं होतं की, अरबाजबरोबर तिने अशी एक डील केली की, तुमच्या घरट्यात अंड घालायच. तो टास्क असा होता जर तुम्हाला एखाद्या सदस्याला कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून काढायचं असेल, तर तुम्ही त्याच्या घरट्यात अंड ठेवायचं. तर यावेळी जान्हवीने असं डील केलं की, वर्षाताईंच्या घरट्यात अंड टाक तू माझ्या घरट्यात अंड टाकू नको, असं तिने अरबाजला सांगितलं. तिने असं म्हटलंच नव्हतं. तिने फक्त एवढं म्हटलं होतं, तू माझ्या घरट्यात अंड टाकू नको. जेणेकरून मला उमेदवारी मिळेल. पण वर्षाताईंच्या घरट्यात अंड टाक असं तिने म्हटलं नव्हतं. तर त्याचा प्रश्न मी जेव्हा त्याला विचारला. तेव्हा त्याने सरळ-सरळ उत्तर देणं नाकारलं. मला म्हणाला, तुम्ही मला बोलायला संधीच दिली नाही. म्हटलं, अरे तू जो १५-२० मिनिटं कोकलत होता. ते काय बोलत होता. तुझ्याकडे मुद्दाच नव्हता,” असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

हेही वाचा – रिया चक्रवर्ती, भारती सिंगसह ‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्याला दिल्ली पोलिसांचा समन्स, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “अजून एकदा त्याने जेलच्या बाबतीत माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेलमध्ये निक्कीला टाकू शकता, तुमच्या अधिकारात ते आहे. तुम्ही कॅप्टन आहात आणि असं करून तो बाजूला झाला. ते मला त्याचं वागणं आवडलं नाही.”

हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, शोच्या पहिल्याच दिवशी टॉप-२ फायनलिस्टचा केला खुलासा, कोण आहेत? जाणून घ्या…

“दुसरं अंकिताला मी काहीही बोलायला गेली तर हा मधेच उभा राहायचा. अरे पण तू का उभा राहतो. तिला तोंड नाहीये का बोलायला? ती बोलू शकत नाही का? ऐरवी ती बोलत असते, भाषणं देत असते. असं व्हायला पाहिजे आणि तसं व्हायला पाहिजे. मग तू का बोलतोस? तुझा खेळ तू खेळना. तू तिचा वकील का होतोस? निक्की त्याला नेहमी चिडवायला म्हणायची, ये सस्ता वकील. मी तसं नाही म्हणणार. पण खरंच तो तिचा वकील आहे. अंकिता स्वतः गप्प बसायची आणि धनंजयला बोलू द्यायची,” असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.