Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम आठवडा सुरू झाला आहे. या अंतिम आठवड्यात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगांवकर हे सात सदस्य पोहोचले आहेत. या सात सदस्यांपैकी एक जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता होणार आहे.

रविवार पंढरीनाथ कांबळे ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घराबाहेर झाला. कमी मतं मिळाल्यानं पंढरीनाथ कांबळेची अंतिम आठवड्यात पोहोचण्याची थोडक्यात संधी हुकली. नवव्या आठवड्यात घरातील सर्व सदस्यांना ‘बिग बॉस’ने नॉमिनेट केलं होतं. त्यामध्ये सूरज आणि निक्की सर्वात आधी सेफ झाले. त्यानंतर अभिजीत आणि वर्षा उसगांवकर घराबाहेर जाण्यापासून वाचले. पुढे धनंजय, जान्हवी आणि अंकिता सेफ असल्याचं जाहीर करून पंढरीनाथ ( Pandharinath Kamble ) घराबाहेर जाणार असल्याचं ‘बिग बॉस’ने सांगितलं. यावेळी घराबाहेर जाताना पंढरीनाथने म्युच्युचल फंड कॉइनचा वारसदार म्हणून सूरजचा निवडलं आणि एक मोठा निर्णय जाहीर केला.

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
maharashtrachi hasya jatra new actress Ashwini kasar entry
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! सेटवरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला सांभाळून घेतल्याबद्दल…”
Bigg Boss 18 Fame actress Yamini Malhotra Struggles To Find House In Mumbai share her experience
“तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम?”, ‘बिग बॉस १८’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीला मुंबईत घर शोधताना आला धक्कादायक अनुभव, म्हणाली…

हेही वाचा – लठ्ठपणावरून ट्रोल करणाऱ्यावर अक्षया नाईक संतापली, मुंबई पोलिसांना टॅग करत म्हणाली, “ही व्यक्ती इतकी…”

पंढरीनाथ म्हणाला की, माझ्या कॉइनचा वारसदार सूरज चव्हाण असेल. तो माझ्या सगळ्या गोष्टींचा वारसदार असेल आणि मी त्याचं पालकत्व आयुष्यभरासाठी घेतलं आहे. पंढरीनाथचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पंढरीनाथ ‘बिग बॉस मराठी’च्या बाहेर आल्यानंतर त्याची जिवलग मैत्रीण विशाखा सुभेदारने ( Vishaka Subhedar ) पहिली पोस्ट केली आहे.

पंढरीनाथ कांबळेचा व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत विशाखाने लिहिलं आहे, “हा आम्हा काही मित्र मैत्रिणींचा देव…#apalapaddy” तसंच विशाखाने पंढरीनाथ संदर्भातील एक व्हायरल पोस्ट देखील शेअर केली आहे.

हेही वाचा – “तुमची तोंडं कोण बघणार…”, अभिजीत बिचुकलेंनी ७० दिवसांत ‘बिग बॉस’ संपवण्याबद्दल लगावला टोला, म्हणाले, “घमंड, उद्धटपणा…”

हेही वाचा – Video: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट प्रेमकथा ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘लय आवडतेस तू मला’ नव्या मालिकेची वेळ जाणून घ्या…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चं ( Bigg Boss Marathi ) पाचवं पर्व सुरू झाल्यापासून विशाखा सुभेदार पंढरीनाथ कांबळेला पाठिंबा देताना पाहायला मिळाली. पंढरीनाथ संदर्भात ती सतत पोस्ट लिहायची. कोणी पंढरीनाथवर टीका केली तर त्याला परखड उत्तर द्यायची.

Story img Loader