Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्यांमध्ये पहिल्या आठवड्यापासून चांगलीच चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे. घरात दोन गट झाले आहेत. दोन्ही गटातील सदस्यांमध्ये सातत्याने वाद होत आहेत. शनिवार, रविवार रितेश देशमुखचा ‘भाऊचा धक्का’ पार पडला. या भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्की तांबोळीपासून सगळ्याच सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. पहिल्या आठवड्यातच पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर झाले. अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने ‘बिग बॉस’च्या घरातील एका सदस्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून विशाखाने सदस्याला मोलाचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वातील पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट केली आहे. ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देत विशाखाने ही पोस्ट शेअर केली आहे. पॅडी कांबळेबरोबरचा फोटो शेअर करत विशाखाने लिहिलं आहे, “फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा मित्रा… तू तिथे त्यांच्या सारखा नसलास तरीही तू खूप खरा आहेस, वेगळा आहेस, सज्जन आहेस, तारेवरची कसरत तुला कायमच जमलीय. तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव.. तुझ्यातले प्लस पॉइंट्स दाखवून दे…गप बसू नकोस…यारों का यार हैं तू..तुझ्या माणसासाठी तू उभा असतोस मदतीला,आज स्वतःसाठी उभा राहा..मित्रा..More power to you Paddy Kamble”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rbi Sanjay Malhotra
‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा – Bigg Boss Marathi: वर्षा उसगांवकरांनी ‘मूर्ख मित्रा’चं लॉकेट दिलं ‘या’ स्पर्धकाला, म्हणाल्या, ‘माझं खच्चीकरण…”

विशाखा सुभेदारची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठीमध्ये ( Bigg Boss Marathi ) तुम्ही पाहिजे होता’, असं काही चाहत्यांनी प्रतिक्रियेतून म्हटलं आहे. त्यावर विशाखा म्हणाली, “पुढच्या वेळेस.” तसंच एका चाहत्याने लिहिलं आहे, ‘मुळात तिथे गेलाच का?’ यावर विशाखा म्हणाली, “तिथे असणं त्याच्या नशिबात आहे. काही गोष्टी वरूनच आधीच ठरलेल्या असतात. आपण फक्त त्याप्रमाणे जिद्द ठेवायची म्हणून गेलाय.”

Vishakha Subhedar

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “हिची लायकी नाही”, निक्की तांबोळीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून पुन्हा भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मुर्ख आहे…”

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेला झापलं

दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने पंढरीनाथ कांबळेला चांगलंच सुनावलं. “यंदा ‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) एका प्रेक्षकाला या घरात एन्ट्री दिलेली आहे. ते लपून छपून तुमचा खेळ पाहत आहेत. पण, स्वत: काहीच करत नाहीयेत. ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे,” असं म्हणत रितेशने पंढरीनाथ कांबळेला खेळ खेळायला सांगितलं.

Story img Loader