Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा रविवारी ( ६ ऑक्टोबर ) मोठ्या थाटामाटात महाअंतिम सोहळा पार पडला. पहिल्या दिवसापासून आपल्या स्वभावाने आणि खेळाने मनं जिंकणारा सूरज चव्हाण विजयी झाला. तर अभिजीत सावंत हा उपविजेता झाला. सध्या दोघांवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील या टॉप-२ सदस्यांची चर्चा सुरू आहे. अशातच सूरज आणि अभिजीतने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम फेरीपर्यंत १७ सदस्यांपैकी सहा सदस्य पोहोचले. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे टॉप-६ सदस्य होते. यामध्ये सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची सुटकेस घेऊन खेळ सोडला. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की असे अनुक्रमे हे सदस्य नॉमिनेट झाले. अखेरीस सूरजने बाजी मारून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी हाती घेतली.

makrand anaspure in manvat murders
“मानवत मर्डर्सची कथा माझ्या गावाजवळच घडली”; बालपणीच्या भीतीदायक आठवणी सांगत मकरंद अनासपुरे म्हणाले, “आमच्या दैनंदिन जीवनावर… “
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
nagpur bhaskar jadhav
“लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
sridevi wanted to work with amar singh chamkila
दिवंगत श्रीदेवींना ‘या’ लोकप्रिय गायकासह करायचा होता चित्रपट, हिंदी शिकवण्याची ऑफरही दिलेली पण…
Cm Eknath Shinde on anand Ashram Video
Anand Dighe Ashram Video : धर्मवीर दिघेंच्या आनंद आश्रमात पैशांची उधळपट्टी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी…”
bhagwan shiva mata parwati vivah live spectacle
शिव-पार्वती विवाह सोहळा आता पुण्यात!, तुम्ही पाहिला का ‘हा’ जिवंत देखावा? Video होतोय Viral
Shinde faction leader Shambhuraj Desai and Thackeray faction leader Ambadas Danve took darshan of Shrimant Dagdusheth Halwai Ganapati
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी घेतले दर्शन

हेही वाचा – “कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज चव्हाण जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर; म्हणाले, “बुक्कीत टेंगुळ आणणारा तो…”

काल ( ७ ऑक्टोबर ) प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर सूरज आणि अभिजीतने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी सूरजने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली. “गणपती बाप्पा मोरया”, “जय श्रीराम” असा जयघोष करताना सूरज दिसला. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्रामवर सूरज आणि अभिजीतचे फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Video: “त्यांची तोंडं बंद केलीस…”, सूरज चव्हाणच्या विजयावर सुरेखा कुडची यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी सुरुवातीपासून…”

हेही वाचा – “जर तसं झालं नसतं तर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची विजेती मी असते”, जान्हवी किल्लेकरचं विधान, म्हणाली…

दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.