Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात एकूण १७ सदस्य सहभागी झाले होते. सुरुवातीपासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन गट पाहायला मिळाले. पण अखेर या १७ सदस्यांमधून बाजी मारून गेला सूरज चव्हाण.

आपल्या साध्या सरळ स्वभावाने आणि जबरदस्त खेळाने सूरज चव्हाणने प्रेक्षकांची अल्पावधीतच मनं जिंकली. त्याला मराठी कलाकार देखील समर्थन देऊ लागले. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम फेरीआधी अनेक मराठी कलाकारांनी सूरजला मतं देण्यासाठी आवाहन केलं होतं. अखेर सूरजनेच बहुमताने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. हे पर्व संपून १९ दिवस उलटले आहेत. पण तरीही अजून या पर्वातील सदस्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सूरजने पहिला रील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
aarya jadhao called suraj chavan
आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
suraj chavan new home bhoomi pujan ceremony
Video : अखेर सूरज चव्हाणला मिळणार हक्काचं घर! भूमिपूजन सोहळा पडला पार; म्हणाला, “दादांनी गरीबाच्या पोराला…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
suraj chavan shares video from farm and drive tractor
Bigg Boss संपल्यावर सूरज चव्हाण रमला गावच्या शेतात, ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “गावरान मुंडे…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा – रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”

“गुलीगत, बिग बॉस, विजेता, झापूक झुपूक” या हॅशटॅगचा वापर करून सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’नंतरचा पहिला रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज अभिजीत सावंतच्या ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ या लोकप्रिय गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. सूरजने हा पहिला रील व्हिडीओ शेअर करताच अवघ्या काही तासांत तो व्हायरल झाला आहे. तसंच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : हृतिक रोशनच्या लाइफ कोच कपलला ‘ही’ चूक पडली महागात, एक जेलमध्ये तर दुसऱ्याला थेट दाखवला बाहेरचा रस्ता!

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता अभिजीत सावंतनेही सूरजच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. “सूरज, आय लव्ह यू,” अशी प्रतिक्रिया अभिजीतने केली आहे. तसंच “अभिजीत सावंतची आठवण येतेय का?”, “अभिजीत सावंत जेव्हा पहिल्यांदा इंडियन आयडल झाला होता…तेव्हा हे गाणंही खूप गाजलं होतं. आज सूरजने त्या गाण्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवला. आठवणी ताज्या झाल्या”, “असेच व्हिडीओ बनव भावा”, “मस्त सूरजच भाऊ असंच पुढे जात राहा”, “कमबॅक सूरज भावा”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”

दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

Story img Loader