Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात एकूण १७ सदस्य सहभागी झाले होते. सुरुवातीपासूनच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दोन गट पाहायला मिळाले. पण अखेर या १७ सदस्यांमधून बाजी मारून गेला सूरज चव्हाण.

आपल्या साध्या सरळ स्वभावाने आणि जबरदस्त खेळाने सूरज चव्हाणने प्रेक्षकांची अल्पावधीतच मनं जिंकली. त्याला मराठी कलाकार देखील समर्थन देऊ लागले. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम फेरीआधी अनेक मराठी कलाकारांनी सूरजला मतं देण्यासाठी आवाहन केलं होतं. अखेर सूरजनेच बहुमताने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. हे पर्व संपून १९ दिवस उलटले आहेत. पण तरीही अजून या पर्वातील सदस्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सूरजने पहिला रील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”

“गुलीगत, झापूक, धोका,” या हॅशटॅगचा वापर करून सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’नंतरचा पहिला रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज त्याच्याच लोकप्रिय डायलॉगवरून तयार केलेल्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. “ओम भट स्वाहा…बुकीत टेंगूळ आणू का तुला… असे बोल या गाण्यात ऐकायला मिळत आहे. सूरजने हा पहिला रील व्हिडीओ शेअर करताच अवघ्या काही तासांत तो व्हायरल झाला आहे. तसंच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : हृतिक रोशनच्या लाइफ कोच कपलला ‘ही’ चूक पडली महागात, एक जेलमध्ये तर दुसऱ्याला थेट दाखवला बाहेरचा रस्ता!

“बॅक टू राडा”, “अखेर तुझा रील व्हिडीओ आला”, “भाऊ इज बॅक”, “अरे व्वा”, “आता इन्स्टाग्रामवर हेचं ट्रेंड करणार”, “भाऊचा कमबॅक कसला आहे”, “सूरज भाई सुरुवात भारी”, “सूरज दादा सगळं कर…पण व्हिडीओ काढण्याची तुझी कला सोडू नकोस”, “भारी बॉस”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 : श्रुतिका झाली ‘बिग बॉस’ची लाडकी, मिळाला मोठा अधिकार; तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीसह १४.६ लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे. सूरज या पैशांचा वापर घर बांधण्यासाठी करणार आहे, असं त्याने माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.