Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला. त्यामुळे सध्या सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. पण एकाबाजूला अभिजीत विजयी न झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. फक्त प्रेक्षक नाहीतर काही कलाकार मंडळींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. अशातच अभिनेता, गायक, संगीतकार, डॉ. उत्कर्ष शिंदेने सूरजवर केलेलं जबरदस्त गाणं चांगलंच व्हायरल होतं आहे.

उत्कर्ष शिंदेने सूरज विजयी होताच त्याच्यावर जबरदस्त गाणं केलं आणि ते संगीतबद्धही केलं. ‘बनला आण बाण बिग बॉसची शान आपला सूरज चव्हाण…’ असं या जबरदस्त गाण्याच्या ओळी आहेत. याचा व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने सूरजच्या विजयावर नाराजी व्यक्त करण्यासाठी मार्मिक पोस्ट लिहिली आहे.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवी किल्लेकरचं घरी जंगी स्वागत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, म्हणाले, “एक नंबर निर्णय…”

उत्कर्षने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “आज कासवाची आणि सशाची शर्यत आठवली…’बनला आण बाण बिग बॉसची शान आपला सूरज चव्हाण…’ आयुष्य जगून समजतं. वाचून अथवा ऐकून नाही. बरेच जण म्हणाले सूरजने काय वेगळं केलं घरात? फक्त झापूक झुपूक तर केलं आणि जिंकला. त्यांना मला हेच सांगायचं आहे, घरात आपुलकी, मानसन्मान, कोणाचा निरादर नाही, कोणाची कधी-कसलीच भीती नाही तर कोणा समोर माज गर्व नाही की कोणासाठी मनात क्लेष नाही. जे होतं स्वच्छ, निर्मळ, सरळ खोटं नाट नाहीच. एकाग्र संयमी कासव उड्या मारणाऱ्या सशाला जसा हरवतो तसाच शांत एकाग्रतेने आपल्या खेळाशी एकनिष्ठ राहून ना लफडे ना झगडे फक्त १०० टक्के मेहनतीने आपला कासव सर्वांची मनेही जिंकण्यात आणि ट्रॉफी ही जिंकण्यात यशस्वी झाला.”

पुढे उत्कर्षने लिहिलं, “आज (६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात माझा परफॉर्मन्स असल्याकारणाने मधेमधे मोबाईलवरच बिग बॉस बघणं सुरुच होतं. जसा सूरज जिंकला हे कळलं इतका आनंद झाला की कार्यक्रम संपवून घरी येऊन सरळ स्टुडिओत आलो आणि लगेच हे गाणं लिहिलं, संगीतबद्ध केलं गायलं आणि लगेच आल्हाद बरोबर व्हिडीओ शूट केलं. एक तासात गाणं तयार.. सूरज जिंकल्याचं आनंद गाऊन नाचून साजरा केला. केदार शिंदे सर आपण दिलेल्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटाची ऑफर ऐकून खूप छान वाटलं. लव्ह यू सर. लवकरच महागायक आनंद शिंदे यांच्या आवाजात मी सूरजच गाणं घेऊन येतोच आहे. सूरज, मित्रा तू लवकर फ्री हो खूप नाचायचंय आणि नाचवायचंय अख्ख्या महाराष्ट्राला. बाकी सूरज जिंकला म्हणून जे जळत असतील त्यांनी बर्नोल क्रिम ओईंटमेंट लावावे वाटल्यास त्याचे पैसे मी देईन.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “डीपी दादांवर अन्याय…”, धनंजय पोवारच्या एक्झिटवर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “चुकीचा निर्णय”

दरम्यान, उत्कर्षने सूरजवर केलेलं गाणं नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “दादा खूपच अप्रतिम गीत सादर केलं…सूरजला जिंकण्यामध्ये तुझा खूप मोठा वाटा आहे…कुणालाही तुझ्यासारखे भाऊ लाभणं हे नशीबच…” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेमामुळे सूरज विजयी झाला आणि त्यासाठी उत्कर्ष दादाने खूप भारी गाणं बनवलं.”

Story img Loader