Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. यावेळी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर जान्हवी किल्लेकर, अरबाज, वैभव, निक्की या सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. अभिनेत्याने जान्हवीला संपूर्ण घरावर दादागिरी करून अपशब्द वापरल्याने खडेबोल सुनावले आहेत. याशिवाय रितेशने काही सदस्यांचं कौतुक देखील केलं आहे. सूरज चव्हाणला असाच चांगला खेळून पुढे जा…असा सल्ला रितेशने दिला. परंतु, रितेशने योगिता चव्हाणचं कौतुक करताच अभिनेत्रीला अश्रू अनावर होऊन तिने मनातली एक इच्छा बोलून दाखवली यावेळी सर्वांनाच धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने अंतरा हे पात्र साकारलं होतं. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तरीही अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायम होती. शूटिंग संपल्यावर या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पाच महिन्यांनी योगिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. अभिनेत्रीकडून सर्वांनाच प्रचंड अपेक्षा आहेत. पण, पहिल्या दिवसापासून योगिता फारसा चांगला खेळ नाहीये ही बाब प्रत्येकाच्या लक्षात आली आहे.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video: वर्षा उसगांवकरांना “हे घाणेरडं तोंड मला दाखवू नका,” म्हणणाऱ्या जान्हवीला रितेश देशमुखने सुनावलं; म्हणाला, “जितके प्रोजेक्ट्स…”

Bigg Boss Marathi : योगिताला अश्रू अनावर

रितेश देशमुखने गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर “योगिता खुलून खेळा…मिस्टर इंडियासारख्या मिस इंडिया होऊ नका” असा सल्ला दिला होता. योगिताने याप्रमाणे स्वत:च्या वागण्या-बोलण्यात अनेक बदल केले. टास्कदरम्यान सुद्धा तिचा सक्रिय सहभाग असतो. अंकिताला कॅप्टन बनवण्यात योगिताचा मोठा वाटा आहे. त्यामुळे रितेशने यावेळी योगिता तुम्ही खूप उत्तम खेळताय अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर योगिता रडू लागली.

योगिताला रितेशसमोर अश्रू अनावर झाले, तिने कसलाही विचार न करता “मी संपूर्ण टीमची माफी मागते. मला माहितीये हे योग्य नाही. मला सगळे सांगतात तू इथे कशाला आलीस…माझंही चुकलं हे मी मान्य करते. असं बोलून योगिता रडू लागते.” यानंतर रितेश सांगतो, “इथे कोण राहणार…कोण जाणार हे माझ्या हातात नसतं. या सगळ्या गोष्टी ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) ठरवतात.”

हेही वाचा : Video : “बांगड्या घाल म्हणजे काय?” जान्हवीच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला रितेश देशमुख; घरातून बाहेर काढणार?

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : योगिता चव्हाण ( फोटो सौजन्य : जिओ सिनेमा )

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातून बेघर होण्यासाठी या आठवड्यात योगितासह घन:श्याम, निक्की, निखिल, पंढरीनाथ, सूरज हे सदस्य नॉमिनेट आहेत. आता यापैकी कोण ‘बिग बॉस’चा निरोप घेणार याचा खुलासा रितेश लवकरच करणार आहे.

Story img Loader