Bigg Boss Marathi Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. घरात नुकतीच एक वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. संग्राम चौगुले नुकताच घरात आल्याने तो काय रणनीती आखणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच आता घरात सातव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाचा नॉमिनेशन टास्क ‘बिग बॉस’ने अनोख्या पद्धतीने डिझाइन केला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सगळ्या स्पर्धकांच्या गळ्यात एकमेकांचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे आता या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अभिजीत सुरुवातीलाच अंकिता आणि डीपीला म्हणतो, “काही झालं तरी आपण चार जण सेफ झालं पाहिजे.” या सदस्यांना बझर वाजल्यावर जादुई दिव्याजवळ सर्वात आधी पोहोचणं गरजेचं आहे. एकंदर हा जादुई दिवा या नॉमिनेशन कार्यात निर्णायक भूमिका बजावणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”

नॉमिनेशन टास्कमध्ये फोटो खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत…

अंकिता – जान्हवीचा फोटो
धनंजय – अभिजीतचा फोटो
वर्षा उसगांवकर – धनंजयचा फोटो
अभिजीत – आर्याचा फोटो
आर्या – वैभव चव्हाणचा फोटो
वैभव चव्हाण – अंकिताचा फोटो
पॅडी – अरबाजचा फोटो
जान्हवी – निक्कीचा फोटो
निक्की – पॅडीचा फोटो
अरबाज – वर्षा उसगांवकर यांचा फोटो

‘कलर्स वाहिनी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरातील सगळे सदस्य नॉमिनेशनपासून सुटका करून घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षा यांचा फोटो अरबाजकडे असल्याने त्या सुरुवातीला त्याच्याशी संवाद साधत नॉमिनेट करू नकोस असं त्याला सांगत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अरबाजने वर्षा यांना नॉमिनेट केलं असण्याची दाट शक्यता आहे. याचं मुख्य कारण, म्हणजे सगळे सदस्य एका ओळीत उभे असताना अरबाजच्या गळ्यात कोणाचाही फोटो नव्हता. याचा अर्थ त्याने वर्षा यांचा फोटो नॉमिनेशनला दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : Video : ‘बिग बॉस’च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक! सगळे झाले खूश पण, सूरजच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

Bigg Boss Marathi

दरम्यान, नॉमिनेशन टास्कमध्ये अंकिता आणि जान्हवीमध्ये देखील वाद होणार आहेत. जान्हवी तिला योग्य कारण देऊन नॉमिनेट कर असं सांगते. आता नेमकं कोण-कोणाला नॉमिनेट करणार हे आजच्या ( Bigg Boss Marathi ) भागात स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi seventh week nomination task jahnavi fight with ankita watch promo sva 00