Bigg Boss Marathi Pandharinath Kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. यावर्षी घरात एकूण १६ सदस्य सहभागी झाले होते. यापैकी एकूण ५ जणांनी घराचा निरोप घेतला. तर, घरात वाइल्ड कार्डच्या रुपात नुकतीच संग्राम चौगुलेने एन्ट्री घेतली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा सुरू आहे. त्यामुळे हा खेळ दिवसेंदिवस कठीण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच घरात सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये शांत असलेला पंढरीनाथ आता सगळ्या टास्कमध्ये आपली चमक दाखवत असल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरीनाथच्या ( Pandharinath Kamble ) करिअरवर बोट ठेवून सुरुवातीच्या काही दिवसात जान्हवीने काही चुकीची वक्तव्य केली होती. यानंतरही अभिनेत्याने आपला संयम सोडला नाही. याबद्दल पॅडीचं रितेश देशमुखने सुद्धा कौतुक केलं होतं. आता बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधवने पंढरीनाथचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : “आर्याने मला मारलं…”, म्हणत निक्की ढसाढसा रडली! घरात जोरदार राडा; थेट ‘बिग बॉस’कडे केली बाहेर काढण्याची मागणी

घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये सर्वांना छोट्या गोण्यांमध्ये कापूस भरून ज्या सदस्यांना कॅप्टन्सीचं उमेदवार बनवायचं नाही अशा सदस्यांना या गेमच्या बाहेर करायचं होतं. या टास्कमध्ये पंढरीनाथने कोणाशीही न भिडता मोठ्या हुशारीने आणि चपळतेने आपला गेम दाखवला. त्याच्या मागे पळून विरुद्ध टीममध्ये असलेल्या अरबाज-वैभवशी दमछाक झाली होती. हा खेळ पाहून नेटकऱ्यांनी पॅडीवर कौतुकाचा वर्षा केला आहेच पण, सिद्धार्थ जाधवने देखील पंढरीनाथसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : कोकणातलं घर, भातशेती अन्…; तितीक्षा तावडेने नवऱ्याला दाखवलं निसर्गरम्य गाव अन् माहेरचं घर; पाहा व्हिडीओ

सिद्धार्थ जाधवची पोस्ट

“Well Played भावा… काही लोकांना ओव्हर अ‍ॅक्टिंग वाटत होती… आज त्यांना तुझा ओव्हर अ‍ॅक्टिव्हपणा नक्कीच दिसला असेल… कसलं पळवलंस दोघांना… यालाच म्हणतात अनुभव! कडक चपळ” अशी पोस्ट लिहित सिद्धार्थने पॅडीचा ( Pandharinath Kamble ) अपमान करणाऱ्या सदस्यांचे देखील अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत.

सिद्धार्थ जाधवने केलं पॅडी कांबळेचं कौतुक ( Pandharinath Kamble )

दरम्यान, या आठड्यात एकूण ६ सदस्य नॉमिनेट आहेत. अंकिता, वर्षा, अभिजीत, आर्या, निक्की आणि वैभव यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे प्रेक्षकांना येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर समजणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi siddharth jadhav praises pandharinath kamble and shares post sva 00