Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाला. पहिल्या दिवसापासून पॅडीने ‘टीम बी’ची साथ कधीही सोडली नव्हती. जान्हवी आणि निक्कीने केलेल्या आरोपांनंतरही फार संयमाने सगळ्या परिस्थितीला सामोरं गेल्याने नेटकऱ्यांकडून सुद्धा पंढरीनाथचं कौतुक करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर जान्हवीच्या आधी पॅडीने घराबाहेर जाणं अनेकांना रुचलेलं नाही. यावर मराठी अभिनेत्री व ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या सोनाली पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत मांडलं मत
सोनाली म्हणाली, “बिग बॉस पाहिलं आणि बंद केलं. कारण, पॅडी दादांचं एकच वाक्य मी ऐकलं नॉमिनी न करता मी सूरजचं जे पालकत्व स्वीकारलंय ते आयुष्यभरासाठी आहे. पॅडी दादांच्या एव्हिक्शनवर मला सगळ्या लोकांना आणि खरंतर ‘बिग बॉस’ला एक प्रश्न विचारायचा आहे की, सगळ्या गोष्टी नेमक्या कुठे चुकत आहेत. खरंच पॅडी दादाला घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) जाण्याची गरज होती का? भलेही घरात मिड एव्हिक्शन होऊदे… पण, जान्हवीच्या आधी पॅडी दादांनी जाणं खरंच बरोबर आहे का? म्हणजे लोक खरंच जान्हवीला घरात ठेवू इच्छित आहेत का? ती पॅडी दादांपेक्षा जास्त…त्या घरात राहणं डिसर्व्ह करते का…की, बिग बॉस तिला पाठीशी घालत आहेत आणि तिची इमेज चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र”, ‘बिग बॉस’चे ‘ते’ शब्द ऐकताच सूरजचे डोळे पाणावले; म्हणाले, “फक्त गुलीगत पॅटर्न…”
“जान्हवी घरात स्वत: म्हणते, मला असं वाटल होतं की, निक्कीसारखं वागल्यामुळे मी व्यवस्थित दिसेन आणि आता ती चांगलं वागतेय…म्हणजेच जसं बोललं जातं ‘बिग बॉस’च्या घरात खरा चेहरा बाहेर येतो… तो जान्हवीचा खरा चेहरा कोणाला दिसलाच नाहीये. तरी सुद्धा पॅडी दादा बाहेर आहेत. म्हणजे हे चाललंय काय…आम्ही बघायचं की नाही बघायचं बिग बॉस?” असा सवाल सोनालीने या व्हिडीओतून ( Bigg Boss Marathi ) उपस्थित केला आहे.
दरम्यान, पंढरीनाथचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्यावर आता या खेळात एकूण ७ सदस्य बाकी आहेत. आता अभिजीत, वर्षा, सूरज, निक्की, अंकिता, धनंजय आणि जान्हवीपैकी या सात जणांपैकी या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.