Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या सदस्यांच्या जोड्या जुळवण्यात आल्या आहेत. या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाल्याने घरातील सदस्यांना एकटं फिरण्याची बंदी असेल आणि सगळे सदस्य कायम ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या जोडीदाराबरोबर राहतील अशा स्पष्ट सूचना सगळ्या स्पर्धकांना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार अभिजीत-निक्की, अरबाज-आर्या, पंढरीनाथ-घन:श्याम अशा एकूण ६ जोड्या ‘बिग बॉस’ने जुळवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’च्या घरात निक्की अन् अभिजीतची मैत्री पहिल्या दिवसापासून अरबाजला खटकत होती. अशातच गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिचे मित्रमंडळी तिच्याविषयी मागून कसे गॉसिप करतात याच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या. यामुळे निक्की भयंकर संतापली आणि तिने ‘ए’ ग्रुपमधून एक्झिट घेतली. निक्कीने तिचा ग्रुप सोडल्यावर घरात जोड्यांनी वावरण्याचा नवीन टास्क सुरू झाला. यामध्ये ‘बिग बॉस’ने निक्की आणि अभिजीत या आठवड्यात जोडी असेल असं जाहीर केलं. एकंदर निक्कीचं कोणतंच वागणं अरबाजला पटत नव्हतं. त्यामुळे आजच्या ( २७ ऑगस्ट ) भागात दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”

Bigg Boss Marathi : अरबाजला शिक्षा

निक्की अरबाजला पूर्णवेळ समजवत होती. मात्र, घरातील इतर सदस्य निक्की फक्त गेमसाठी हे करतेय…अरबाज तिच्या नादी लागू नकोस असा सल्ला त्याला देत होते. निक्की समजूत काढायला जवळ जाताच अरबाज प्रचंड भडकतो आणि किचनमध्ये त्याने भांडी फोडल्याचं पाहायला मिळालं. पुढे, अरबाज बेडरुमच्या दिशेने गेल्यावर निक्की त्याच्या मागोमाग जाते. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते परंतु, अरबाज काही केल्या तिचं ऐकत नाही. इथेही दोघांमध्ये वाद होऊन बेडरुममध्ये त्याने आदळआपट केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस’च्या घरात एवढा मोठा राडा झाल्यावर सर्व सदस्यांना ताबडतोब लिव्हिंग एरियामध्ये जमण्याचे आदेश देण्यात आले. “घरात तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आहे” असं ‘बिग बॉस’कडून अरबाजला सांगण्यात आलं. तसेच याची शिक्षा म्हणून या आठवड्यात अरबाजकडून कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi : अरबाजला शिक्षा ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Video : मानकाप्याच्या गुहेत घन:श्यामची एन्ट्री; गोंधळलेल्या छोट्या पुढारीला बिग बॉस म्हणाले, “मान वळवायला…”

अरबाजकडून कॅप्टनसी उमेदवारी काढून घेतल्यावर वर्षा उसगांवकरांनी निक्कीला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळालं. आता येत्या ( Bigg Boss Marathi ) भागात अरबाज-निक्कीचं भांडण मिटणार की अजून वाढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.