Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. घरात आता एकूण १२ स्पर्धक उरले असून रितेश देशमुख दर वीकेंडला या स्पर्धकांची शाळा घेत असतो. घरात केलेल्या चुकीच्या वर्तनाबद्दल रितेश शनिवारच्या भागात या सदस्यांना जाब विचारतो. तर, रविवारी भाऊच्या धक्क्यावर धमाल, मस्ती पाहायला मिळते. यावेळी घरात ‘जोडीचा मामला’ हा टास्क घेण्यात आला होता. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर घरातील सदस्यांना ‘बिग बॉस’ने बनवलेल्या जोड्यांनुसार डान्स करायचा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज-आर्या, निक्की-अभिजीत, अंकिता-वर्षा, पॅडी-घन:श्याम, वैभव-डीपी या सगळ्या सदस्यांनी भन्नाट परफॉर्मन्स सादर केले. मात्र, सध्या सगळीकडे जान्हवी अन् सूरजने भाऊच्या धक्क्यावर केलेल्या जबरदस्त डान्सची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर उत्तम डान्सर आहेच पण, सूरज चव्हाण देखील त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. या दोघांची डान्समधली एनर्जी पाहून रितेश देशमुख देखील आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! ‘त्या’ निर्णयामुळे नेटकरी वर्षा-अंकितावर नाराज, नेमकं काय घडलं?

जान्हवी – सूरजचा जबरदस्त डान्स

‘कोंबडी पळाली’ या मराठी कलाविश्वातील सदाबहार गाण्यावर जान्हवी अन् सूरजने ठेका धरला होता. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जत्रा’ चित्रपटातील हे गाणं आहे. भरत जाधव आणि क्रांती रेडकर या मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांनी मूळ गाण्यात जबरदस्त डान्स केला आहे. जान्हवी अन् सूरजने देखील त्याच एनर्जीने परफॉर्मन्स सादर करण्याचा प्रयत्न केला.

‘गुलीगत धोका’ फेम सूरज चव्हाण त्याच्या ‘झापुक झुपूक’ या हुकस्टेपसाठी ओळखला जातो. ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर डान्स करताना दोघांनीही एकत्र ‘झापुक झुपूक’ हुकस्टेप केली. यामुळे रितेश देशमुखने देखील या दोघांचं विशेष कौतुक केलं. याशिवाय नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी देखील सूरज – जान्हवीच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. या दोघांच्या जोडीने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

हेही वाचा : जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! मिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांनी केलं सूरज-जान्हवीचं कौतुक

अभिनेता व आधीच्या पर्वात ( Bigg Boss Marathi ) सहभागी झालेला स्पर्धक उत्कर्ष शिंदेने “फायर परफॉर्मन्स…” म्हणत या डान्ससाठी सूरजचं कौतुक केलं आहे. “मस्तच सूरज खूप छान”, “झापुक झुपूक कोंबडी पळाली”, “सूरज भाऊ एक नंबर”, “सूरज आणि जान्हवी नाद केला दोघांनी कडक” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सूरज-जान्हवीचा डान्स पाहून दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi suraj chavan and jahnavi killekar dances on kombadi palali song video viral sva 00