Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी एन्ट्री घेतली होती. यापैकी अल्पावधीतच सूरजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आजच्या घडीला त्याने एवढं मोठं यश मिळवलं आहे.
सूरजने सुरुवातीला ‘बिग बॉस’च्या घरात येण्यास नकार दिला होता. मात्र, कालांतराने शोच्या प्रोजेक्ट हेडने त्यांची समजून काढून सूरजला बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष भेटून सांगितल्या. त्याचं ट्रेनिंग झालं आणि यानंतर सूरज घरात सहभागी झाला होता. गावाकडचं राहणीमान आणि शैक्षणिक गाभा नसलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीचे काही दिवस खूपच कठीण गेले. मात्र, कालांतराने त्याला खेळ कसा खेळायचा याची समज आली.
हेही वाचा : Video : “डीपीचा खेळ रंपाट होता अन्…”, Bigg Boss च्या घरातील प्रवास पाहून धनंजय झाला भावुक, पाहा व्हिडीओ
सूरज नवीन घर बांधून त्याला देणार बिग बॉसचं नाव
सूरजला पॅडी, अंकिता, डीपी, अभिजीत या संपूर्ण ‘बी टीम’ने सुरुवातीपासून खंबीर साथ दिली. त्याच्याकडे स्वत:चं राहतं घर सुद्धा नाहीये. त्यामुळे स्वत:च्या प्रवासाची चित्रफीत पाहून भावुक झालेला सूरज सर्वांना म्हणाला, “आपले आई-बाप असेल, तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही…कोण कोणाला विचारत नाही. मी कोणत्या परिस्थितीतून वर आलोय माझं मला माहिती आहे. देवीच्या जत्रेला गेल्यावर लोक नावं ठेवायचे, काही बोलायचे पण, आता सगळं बदललं आहे. मला खूप मोठी संधी मिळाली याचं मी नक्की सोनं करणार आहे.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “अनेक बायकांचा नवरा…”, अरबाजबद्दल ‘तो’ प्रश्न विचारताच Splitsvilla फेम नायराचं मोजक्या शब्दांत स्पष्ट उत्तर, म्हणाली…
“मला हा माझा प्रवास पाहून खूपच भारी वाटलं. मी ‘बिग बॉस’ला कधीच विसरणार नाही. आता हा शो संपल्यावर मी बाहेर जाऊन घर बांधणार…त्या घराला मी ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे. झापुक झुपूक ‘बिग बॉस’ गुलीगत…बुक्कीत टेंगूळ आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार” असा निर्धार सूरजने केला आहे.