Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’च्या घरात आज मिडवीक एव्हिक्शन होणार आहे. सध्या घरात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर असे सात सदस्य आहेत. आता यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्याआधी घरात बीबी हाऊस पार्टी रंगणार आहे.

निक्की सोडून घरातील ( Bigg Boss Marathi ) सहा सदस्य सध्या नॉमिनेट असून यांच्यापैकी शेवटच्या क्षणी कोणता सदस्य घराचा निरोप घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या एलिमिनेशन टास्कपूर्वी घरातील सगळ्या सदस्यांसाठी ‘बिग बॉस’ने एका पार्टीचं आयोजन केलं आहे. यासाठी घरात एन्ट्री घेणार आहे डीजे क्रेटेक्स.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Pooja Sawant First Makar Sankrant dance video
ऑस्ट्रेलियात पूजा सावंतचा बहिणीसह जबरदस्त डान्स! पहिल्या संक्रांतीला मराठमोळा साज, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली स्वत:ची गाडी! लेक तेजस्विनी आईबद्दल म्हणाली…

बीबी पार्टीसाठी ( Bigg Boss Marathi ) घरात डीजे क्रेटेक्स एन्ट्री घेणार आहे. ‘मराठी गाणं वाजलंच पाहिजे’ म्हणणारा कृणाल घोरपडे ( डीजे क्रेटेक्स ) घराघरांत लोकप्रिय आहे. त्याच्या “तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका लका…” या गाण्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे क्रेटेक्स घरात येणार हा प्रोमो पाहूनच नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय घरातील सदस्यांना देखील तब्बल ६७ दिवसांनी पार्टी करण्याची संधी मिळणार आहे.

Bigg Boss Marathi : सूरजचा जबरदस्त डान्स

क्रेटेक्स ‘बिग बॉस’च्या घरात येताच सूरजला म्हणतो, “कसं काय भावा…” यानंतर सगळे सदस्य “सूरज…सूरजSS” असं ओरडू लागतात. सर्वांनी दिलेलं प्रोत्साहन पाहून सूरज देखील बेभान होऊन डान्स करत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘गुलीगत’ डान्स करत सूरजच्या ‘झापुकू झपूक’ हुकस्टेपने यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “अरबाजने सॉरी म्हटल्यावर लगेच तू त्याच्या गळ्यात पडणार” म्हणत सूरजने निक्कीला लगावला टोला अन् लावली ट्रॉफीची पैज

सूरजचा डान्स पाहून सगळेच भारावून गेले होते. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आम्ही फक्त सूरजला सपोर्ट करणार…”, “सूरज फुल्ल डीजे”, “सूरज विनर होणार”, “भारी डान्स” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या ( Bigg Boss Marathi ) व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader