Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरवर्षी घरात शेवटच्या आठवड्यात स्पर्धेत टिकून राहिलेल्या सगळ्या स्पर्धकांना त्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील संपूर्ण प्रवास दाखवण्यात येतो. मात्र, यावर्षी यामध्ये एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. यंदा हे सगळे स्पर्धक पहिल्यांदाच आपला प्रवास पाहण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पाऊल टाकणार आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर आणि अंकिता वालावलकर या स्पर्धकांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. आता आजच्या भागात सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’च्या घरातील आजवरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बुक्कीत टेंगूळ’ म्हणत या सूरज चव्हाणने ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात प्रवेश केला. अल्पावधीतच त्याने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वत:चा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आलेला सूरज त्याला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून प्रचंड भावुक झाला होता.

हेही वाचा : Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट! स्पर्धक घराबाहेर येणार अन्…; पाहा व्हिडीओ

पडद्यावर आपला प्रवास पाहून सूरज झाला भावुक

सूरजच्या प्रवासाविषयी ‘बिग बॉस’ म्हणाले, “आपण माझेच काय तर तुम्ही संबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात… या सीझनमध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले. पण, या घरात गाजला फक्त गुलीगत पॅटर्न!” हा संपूर्ण प्रवास रुपेरी पडद्यावर पाहून सूरज प्रचंड भावुक झाला होता. त्याचे डोळे पाणावले होते. ‘झापुक झुपूक’ म्हणत या सोशल मीडिया स्टारने आपला प्रवास सेलिब्रेट केला.

Bigg Boss Marathi : सूरजने पाहिला ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

शिव ठाकरे देखील सिनेमागृहात प्रेक्षकांबरोबर सूरजला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होता. त्याने सूरजचं भरभरून कौतुक केलं. अत्यंत लहानशा गावातून सूरजने आपला प्रवास सुरू केला. त्याचं शिक्षण देखील पूर्ण झालेलं नाही. फक्त सोशल मीडियावरील रील्समुळे तो घराघरांत प्रसिद्ध झाला. अशातच ‘बिग बॉस’ची संधी मिळाल्याने सूरजचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.

हेही वाचा : “त्याला मोठं घर, बाथरुम वगैरे माहिती नव्हतं”, ‘बिग बॉस’साठी सूरज चव्हाणने दिलेला नकार; गावात जाऊन टीमने केलेली मनधरणी

आता ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. आता यांच्यापैकी टॉप-५ मध्ये प्रवेश करून कोण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी उंचावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi suraj chavan emotional after watching his own journey on big screen with audience sva 00