Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘गुलीगत धोका’, ‘झापुकू झुपूक’ हे दोन शब्द कानावर आले की, लगेच आठवतो सूरज चव्हाण. ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात या सोशल मीडिया स्टारला का घेतलं? असा प्रश्न विचारणारे लाखो प्रेक्षक आताच्या घडीला सूरजचे कट्टर चाहते झाले आहेत. कधीही शाळेत न गेलेला हा सोशल मीडिया स्टार लाखो प्रेक्षकांचं मन जिंकून ‘बिग बॉस’च्या खेळात एवढा पुढे जाईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण, घरातील अन्य सदस्यांकडून टास्क समजून घेत आणि तगड्या स्पर्धकांना ‘गुलीगत धोका’ देत आता सूरज टॉप ८ मध्ये जाऊन पोहोचला आहे.

सूरजला आई-वडील नसल्याने ‘फॅमिली वीक’मध्ये त्याच्या घरचं कोण येणार याबद्दल घरातील प्रत्येकजण काळजी होता. अखेर ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोतून सूरजला भेटायला घरी कोण येणार याचा उलगडा झालेला आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष करून आणि अनेक अडचणींवर मात करत सूरज चव्हाणने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. वडिलांचं निधन झाल्यावर या रीलस्टारने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले पण, सूरज खचला नाही. त्याच्या लोकप्रियतेमुळेच त्याला ‘बिग बॉस’सारखा मोठा शो ऑफर करण्यात आला. घरात प्रवेश घेतल्यावर अगदी अल्पावधीतच सूरजचा साधाभोळा स्वभाव सर्वांना भावला. आताच्या घडीला सूरजने हे पर्व जिंकावं ही इच्छा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Video: …म्हणून धनंजयने हात जोडून निक्कीची मागितली माफी; म्हणाला, “मोठा भाऊ समजून…”, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

सूरज चव्हाणचे कुटुंबीय आले ‘बिग बॉस’च्या घरात

सूरजला भेटण्यासाठी त्याच्या बहिणी आणि त्याची आत्या यांनी घरात प्रवेश केल्याचं प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. आपल्या कुटुंबीयांना पाहून तो प्रचंड आनंदी होतो. सूरजचे कुटुंबीय यावेळी म्हणतात, “तुझ्यामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो” त्यांचे हे शब्द ऐकताच घरातील सगळ्याच सदस्यांचे डोळे पाणावतात. अगदी वर्षा उसगांवकर सुद्धा भावुक झाल्याचं या प्रोमोमध्ये ( Bigg Boss Marathi ) पाहायला मिळतंय.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: “सगळं संपलं,” अरबाजबद्दल आईने सांगितलं ते ऐकून भडकली निक्की, त्याचे कपडे फेकले अन्… पाहा VIDEO

सूरज चव्हाण आणि त्याच्या कुटुंबीयांच्या प्रोमोवर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आज सूरजसाठी संपूर्ण महाराष्ट्र रडणार”, “आम्ही कधीपासून सूरजच्या कुटुंबीयांची वाट पाहत होतो” अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, या आठड्यात फॅमिली वीक टास्क जरी सुरू असला तरीही घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी सगळे ८ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या भाऊच्या धक्क्याची ( Bigg Boss Marathi ) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader