Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळीचे घरातील सगळ्याच सदस्यांबरोबर वाद सुरू झाले आहेत. वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, अंकिता वालावलकर यांच्यानंतर आता निक्की आणि सूरज चव्हाण यांच्यातील जोरदार भांडणं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून गेम न समजल्यामुळे सूरज चव्हाण काहीसा घाबरून खेळत होता. त्याला गेमही व्यवस्थित समजला नसल्याचं नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत त्याने मान्य केलं. यामुळे पहिल्याच आठवड्यात घरातल्या अन्य सदस्यांनी त्याला नॉमिनेट केलं. परंतु, हळुहळू सूरजला हा गेम नेमका कसा खेळावा लागतो हे कळून चुकलं आहे. त्यामुळे आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरज अन् निक्कीमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनच्या खोलीत जाऊन प्रियाचं नवीन नाटक अन् सायली…; मिस्टर सुभेदारांची उडणार तारांबळ, पाहा प्रोमो
निक्की रागात सूरजला म्हणते, “तू कल्पना देखील करू शकणार नाहीस असं रुप माझं बघशील” यानंतर ‘बिग बॉस’ सूरजला कन्फेशन रुममध्ये बोलावून घेतात आणि “सूरज बिनधास्त खेळा, कोणालाही न घाबरता खेळा” असा सल्ला त्याला देतात. यानंतर सूरज म्हणतो, “आता मी कोणालाच भीत नसतो, कारण मीच आहे गुलीगत टॉपचा किंग”
‘कलर्स मराठी’ वाहिनीने “सूरज कोणालाच नाही भीत, त्याच्या युनिक स्टाईलने करणार सगळ्यांना गुलीगत चीत” असं कॅप्शन देत हा नवीन प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : नॉमिनेशवरून योगिता चव्हाण अन् जान्हवी किल्लेकरमध्ये पडली वादाची ठिणगी, पाहा प्रोमो
‘बिग बॉस’च्या या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी सूरजसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “सूरज त्यांना घाबरु नको…ते जरी मोठ्या घरातले असेल तरी त्यांना तुझ्या इतकी दुनियादारी माहीत नाही..तू न घाबरता खेळ”, “तू लढ भावा… सगळा महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे…”, “आता होणार निक्कीची चिक्की मग…” अशा कमेंट्स युजर्सनी या व्हिडीओवर केल्या आहेत. आता गुलीगतची नवी स्टाईल नक्की कशी असेल, नव्या खेळीने तो नक्की काय करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.