Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार आणि पुढच्या आठवड्याची इम्युनिटी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार घराचा नवा कॅप्टन ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण झाला आहे. सूरज कॅप्टन झाल्याने घरातल्या सदस्यांसह नेटकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅप्टन्सीचे उमेदवार निवडण्यासाठी गुरुवारी घरात एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे चार सदस्य शेवटपर्यंत बसमध्ये टिकून राहिले. त्यामुळे हे चार जण कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले होते. पाचव्या सीझनमध्ये आतापर्यंत अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर यांना कॅफ्टन पदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे घरातील पाचवा कॅप्टन होण्यासाठी सूरज इच्छुक होता.

हेही वाचा : Video : “अप्सरा आली…”, मराठी गाण्यावर थिरकली दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी; बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स

सूरज झाला नवीन कॅप्टन

सूरजने गुरुवारच्या ( Bigg Boss Marathi ) भागात पंढरीनाथ कांबळेशी संवाद साधताना कॅप्टन होण्याची इच्छा बोलून दाखवली होती आणि यासाठी मी वैयक्तिक खेळ खेळणार असंही तो म्हणाला होता. सूरजने आता ते करून दाखवलं आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान सूरजला मिळाला आहे. तो कॅप्टन झाल्यावर घरात सर्व सदस्यांनी एकच धमाल केली. निक्कीने धावत येऊन त्याला मिठी मारली. “हमारा कॅप्टन कैसा हो सूरज जैसा हो” अशी घोषणाबाजी करण्यात आली. एवढंच नव्हे तर सर्व सदस्यांनी मिळून सूरजबरोबर ‘झापुक झुपूक’ बोलत डान्स देखील केला.

‘कलर्स मराठी’ने हा प्रोमो शेअर करत याला “त्याच्या झापुक झुपुकने जिंकलंय सगळ्यांचं काळीज, एकमुखाने म्हणत आहेत आमचा कॅप्टन म्हणजे सूरज!” असं कॅप्शन दिलं आहे. कॅप्टन रुमचा ताबा घेण्याआधी सूरज खोलीच्या वाकून पाया पडला. त्याने रुममध्ये प्रवेश घेतल्यावर सुद्धा हात जोडल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता सूरज हे घर शांत ठेवण्यात यशस्वी होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi : सूरज चव्हाण

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “तू डबल ढोलकी आहेस”, निक्कीचं आता अभिजीतशी वाजलं; भांडणं पाहून अंकिता म्हणते, “दोघात तिसरा अन्…”

दरम्यान, विशाल निकम, तृप्ती देसाई, मेघा धाडे या कलाकारांनी या नवीन प्रोमोवर कमेंट करत सूरजचं कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील सूरजचं सर्वत्र कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi suraj chavan is the new captain of the house watch promo sva 00